मोठा झटका! बेरोजगार तरुणाला 24.61 लाखांची GST नोटीस; केलं 1.16 कोटींच्या कंपनीचा मालक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 12:09 PM2023-07-11T12:09:27+5:302023-07-11T12:10:54+5:30

22 वर्षीय देवेंद्र कुमार मजूर म्हणून काम करायचा पण आता त्याच्याकडे कोणतंही काम नाही. असं असताना त्याला जीएसटी विभागाकडून नोटीस देण्यात आली आहे.

unemployed gets gst notice also makes owner of rs 1 crore company | मोठा झटका! बेरोजगार तरुणाला 24.61 लाखांची GST नोटीस; केलं 1.16 कोटींच्या कंपनीचा मालक

मोठा झटका! बेरोजगार तरुणाला 24.61 लाखांची GST नोटीस; केलं 1.16 कोटींच्या कंपनीचा मालक

googlenewsNext

उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका बेरोजगार तरुणाला तब्बल 24.61 लाखांची जीएसटी नोटीस मिळाली आहे. 22 वर्षीय देवेंद्र कुमार मजूर म्हणून काम करायचा पण आता त्याच्याकडे कोणतंही काम नाही. असं असताना त्याला जीएसटी विभागाकडून नोटीस देण्यात आली आहे. तसेच तो 1.36 कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या कंपनीचा मालक आहे असंही सांगण्यात आलं.

जीएसटी 24.61 लाख रुपयांची थकबाकी आहे, ती देवेंद्रने लवकरात लवकर भरावी असं नोटीसमध्ये म्हटलं आहे. देवेंद्रला जीएसटीची नोटीस मिळाल्यावर मोठा धक्का बसला आहे. या धक्क्यातून तो सावरत नाही तोपर्यंत त्याला एप्रिलमध्ये जीएसटी विभागाकडून आणखी एक नोटीस मिळाली, ज्यामध्ये सांगितलं होतं की त्याच्याकडे आणखी एक कंपनी आहे ज्याची किंमत 1.16 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

इंडियन एक्सप्रेस या न्यूज वेबसाईटनुसार देवेंद्रने सांगितले की, तो मजूर म्हणून काम करून आपला उदरनिर्वाह करतो. पण गेल्या अनेक महिन्यांपासून मजुरीचं काम देखील न मिळाल्याने तो बेरोजगार आहे. कोट्यवधींची कंपनी असणे आणि लाखोंची जीएसटी थकबाकी असणे ही बाब देवेंद्रसाठी मोठा धक्का आहे. 

देवेंद्रने बुलंदशहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांच्या तपासात हे प्रकरण आता गौतम बुद्ध नगर पोलिसांपर्यंत पोहोचले आहे कारण देवेंद्रला संशय आहे की त्याने दोन वर्षांपूर्वी नोएडा कंपनीत काम केलं होतं. त्या कंत्राटदारांनी त्याच्या नावावर कंपनी स्थापन करून त्याच्या प्रमाणपत्रांमध्ये काही तरी गडब़ड केली. यात फसणुकीचा संशय आहे. मात्र, त्या कंत्राटदारांची नावे समोर आलेली नाहीत.
 

Web Title: unemployed gets gst notice also makes owner of rs 1 crore company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.