हाहाकार! उत्तर प्रदेशात पावसाचा प्रकोप, 19 जणांचा मृत्यू; 168 गावांना पुराचा फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 10:17 AM2023-09-12T10:17:51+5:302023-09-12T10:18:13+5:30
गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण होत आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे.
उत्तर प्रदेशात पावसाचा कहर सुरूच आहे. सततच्या पावसामुळे आतापर्यंत 19 जणांना जीव गमवावा लागला आहे. हरदोईमध्ये चार, बाराबंकीमध्ये तीन, प्रतापगड आणि कन्नौजमध्ये प्रत्येकी दोन आणि अमेठी, देवरिया, जालौन, कानपूर, उन्नाव, संभल, रामपूर आणि मुझफ्फरनगर जिल्ह्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण होत आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे.
सर्वसामान्य जनता आणि शेतकरी प्रचंड घाबरले आहेत. परंतु राज्याचे मदत आयुक्त जीएस नवीन कुमार म्हणाले की, काळजी करण्याची गरज नाही, सध्या सर्व धरणे सुरक्षित आहेत. उत्तर प्रदेशातील पावसाच्या स्थितीबाबत माहिती देताना मदत आयुक्त जीएस नवीन कुमार म्हणाले की, राज्यात कुठेही चिंतेची परिस्थिती नाही. गेल्या 24 तासांत उत्तर प्रदेशमध्ये सरासरी 31.8 मिमी पाऊस झाला असून तो सरासरीपेक्षा 6.4 मिमी आणि 497 टक्के जास्त आहे. राज्यात 1 जून 2023 पासून आतापर्यंत 577.4 मिमी पाऊस झाला आहे. सरासरी 665.2 मिमी पाऊस पडला, जो सामान्य पावसापेक्षा जास्त होता आणि ते 87 टक्के आहे.
लगातार हो रही भारी बारिश से UP कराह रहा है। यातायात ठप हो गया है। जगह-जगह जलभराव प्रशासन की पोल खोल रही है। जल निकासी का उचित प्रबंधन न करना सरकार की नाकामी है। कही सड़क धंस गयी है तो कही पुलिया टूट गयी। बारिश में सरकार के तमाम दावों की पोल खुल गयी।#UPRain#Rain#UttarPradeshpic.twitter.com/BDdEDtGIno
— SATENDRA SHARMA (@SatendraLive) September 11, 2023
आयुक्त म्हणाले की, गेल्या 24 तासांत राज्यातील 25 जिल्ह्यांमध्ये 30 मिमी आणि त्याहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. मात्र, कोणतीही नदी धोक्याच्या पातळीच्या वर वाहत नाही. 10 जिल्ह्यातील 168 गावांना पुराचा फटका बसला आहे. NDRF, SDRF आणि PAC च्या एकूण 4 टीम पावसाने प्रभावित झालेल्या जिल्ह्यांमध्ये शोध आणि बचाव कार्य करत आहेत. लोकांना दिलासा देण्यासाठी एकूण 69674 रेशन किट, 448670 जेवणाची पाकिटे आणि 3150 डिग्निटी किटचे वाटप करण्यात आले आहे.
राज्यात आतापर्यंत 1101 पूर निवारे, 869 जनावरांच्या छावण्या, ज्यामध्ये चारा इत्यादी व्यवस्था आणि 2869291 जनावरांचे लसीकरण, 1504 फ्लड पोस्ट, 2513 वैद्यकीय पथके तयार करण्यात आली आहेत. याशिवाय 3421 बोटींचाही बचाव आणि मदतकार्यासाठी वापर करण्यात येत आहे. पूरग्रस्त भागातील सुमारे 2775 गोठ्यातील 4,61,778 जनावरे आणि इतर जनावरांसाठी चाराही व्यवस्था करण्यात आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.