चितेवर मृतदेह ठेवताच शरीरात हालचाल; कुटुंबीयांनी रुग्णालय गाठले, पुढे...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2023 07:04 PM2023-10-22T19:04:37+5:302023-10-22T19:05:20+5:30
उत्तर प्रदेशातील बांदा शहरात एक विचित्र घटना घडली.
Uttar Pradesh:उत्तर प्रदेशातील बांदा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका वृद्ध व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांनी अंत्यसंस्काराची तयारी केली. त्या व्यक्तीला जाळण्यासाठी चितेवर झोपवले, तेवढ्यात एक विचित्र घटना घडली.
शहर कोतवाली परिसरातील शंभू नगर मोहल्ला येथील रहिवासी वृंदावन (76 वर्षे) यांचा मृत्यू झाला होता. मृतदेह घेऊन कुटुंबीय मुक्तिधाम येथे पोहोचले. अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली, मृतदेहही चितेवर ठेवण्यात आला होता. इतक्यात वृद्धाचे ओठ आणि गाल हलू लागले. मृतदेहात जीव असल्याचा संशय कुटुंबीयांना आला.
कुटुंबीयांनी त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले. याप्रकरणी जिल्हा रुग्णालयाच्या अतिरिक्त वैद्यकीय अधीक्षकांनी सांगितले की, कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर शरीराचे तापमान हळूहळू कमी होत जाते. यामुळे स्नायू हलचाल करतात. अशी घटना अनेकवेळा पाहिली गेली आहे. डॉक्टरांच्या तपासणीनंतर वृद्धावर अंत्यसंस्कार करण्यात आले.