"पेंडालमधून गुरुजींची कार निघाली, लोक दर्शनासाठी धावले अन्..."; नेमकं काय घडलं? पीडित प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2024 11:21 PM2024-07-02T23:21:27+5:302024-07-02T23:22:45+5:30

सत्संगाचा कार्यक्रम संपल्यानंतर, गुरुजींची कार निघाली. यानंतर, त्यांचे दर्शन घेण्यासाठी लोक धावू लागले. यामुळे चेंगराचेंगरी झाली. यावेळी अनेक लोक खाली पडले होते, त्यांच्यावरून लोक धावत होते.

Uttar pradesh hathras stampede Guruji's car left the pendal, people ran for darshan What exactly happened The victim said | "पेंडालमधून गुरुजींची कार निघाली, लोक दर्शनासाठी धावले अन्..."; नेमकं काय घडलं? पीडित प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं

"पेंडालमधून गुरुजींची कार निघाली, लोक दर्शनासाठी धावले अन्..."; नेमकं काय घडलं? पीडित प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं

उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील रतिभानपूरमधील पुलराई गावात मगळवारी भोले बाबा यांच्या सतसंगाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत जवळपास 100 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये अधिकांश महिला आणि लहान मुलांचा समावेश असल्याचे समजते. या घटनेसंदर्भात प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, एका शेतात सत्संगाचा पेंडाल लागलेला होता. सत्संगाचा कार्यक्रम संपल्यानंतर, गुरुजींची कार निघाली. यानंतर, त्यांचे दर्शन घेण्यासाठी लोक धावू लागले. यामुळे चेंगराचेंगरी झाली. यावेळी अनेक लोक खाली पडले होते, त्यांच्यावरून लोक धावत होते.

दुर्घटनेसंदर्भात आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, प्रत्यक्षदर्शी रामदास नामक एका व्यक्तीने सांगितले की, "ते त्यांच्या पत्नीला औषध देण्यासाठी अलीगडला गेले होते. तेथून परतल्यानंतर, सत्संगाच्या कार्यक्रमासाठी आले. रामदास बाहेर सेवेकऱ्यांजवळच थांबले होता. या वेळी त्याला चेंगराचेंगरीची माहिती मिळाली. या चेंगराचेंगरीत त्यांची पत्नीही सापडली. नंतर, त्यांना सांगण्यात आले की रुग्णवाहिका लोकांना घेऊन एटा येथे गेली आहे. यामुळे ते एटाला आले. प्रचंड गर्दीमुळे ही घटना घडल्याचेही त्यांनी सांगितले."

ते म्हणाले, "पेंडाल आमच्यापासून लांब होता. मात्र, दीड - दोन लाख लोक होते. 50 ते 60 बीघ्यांवर पेंडाल होता. संपूर्ण रोड जाम होता. त्यांनी सांगितले की, त्यांच्या पत्नीची भोले बाबांवर श्रद्धा होती. दुर्घटनेत बचाव कर्यासाठी पीएसीच्या तीन कंपन्या आणि SDRF ची एक कंपनी घटनास्थळी आहे.

हेल्पलाइन नंबर -
या दुर्घटनेनंतर, हाथरस जिल्हा प्रशासनाने सर्वसामान्य लोकांच्या मदतीसाठी हेल्पलाइन नंबरही जारी केले आहेत. ते 05722227041 तथा 05722227042  असे आहेत.

मुख्यमंत्री बुधवारी घटनास्थळी पोहोचणार -
हाथरस दुर्घटनेसंदर्भात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दु:ख व्यक्त केले असून, घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचून मदत कार्याला वेग आणण्याची सूचना देण्यात आली आहे. याच बरोबर, जखमींवर योग्य उपचार करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. याशिवाय, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बुधवारी घटनास्थळी जाऊन घटनेचा आढावा घेतील. ते येथे पीडित कुटुंबांची भेट घेतील. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत मुख्यसचिवही उपस्थित राहतील.

मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २ लाख रुपयांची मदत -
तसेच मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २ लाख आणि जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, कार्यक्रमाच्या आयोजकांविरोधाक एफआयआर दाखल करून कारवाई करण्याची तयारी शासनाकडून करण्यात येत आहे. तसेच या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे.

Web Title: Uttar pradesh hathras stampede Guruji's car left the pendal, people ran for darshan What exactly happened The victim said

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.