DJ वर गाणी लावून निघाली अंत्ययात्रा; महिला नाचल्या, लोकांनी पैशेही उडवले...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2023 01:46 PM2023-08-01T13:46:38+5:302023-08-01T13:47:14+5:30
तुम्ही यापूर्वी बँडच्या तालावर अंत्ययात्रा निघाल्याचे पाहिले असेल, पण आता DJ वर अंत्ययात्रा काढली गेली आहे.
Funeral on DJ: तुम्ही अनेकदा कोणाच्या लग्नात किंवा एखाद्या कार्यक्रमात Dj वर लोक नाचताना पाहिले असतील. पण, तुम्ही कधी एखाद्याच्या अंत्ययात्रेत Dj लावलेला आणि त्यावर लोक नाचताना पाहिले आहेत का? तुम्ही म्हणाल, अंत्ययात्रेसाठी कुणी Dj लावेल का? तर असे घडले आहे. हा नवीनच प्रकार सोमवारी उत्तर प्रदेशातीलझांसी जिल्ह्यातील समथर येथे पाहायला मिळाला. या अनोख्या अंत्ययात्रेची परिसराच जोरदार चर्चा होत आहे.
हे प्रकरण झाशी जिल्ह्यातील समथरमधील आहे. लोहपिता (लोगदरिया) समाजातील एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर कुटुंबातील सदस्यांनी डीजेवर नाचत मोठ्या थाटामाटात त्याची अंत्ययात्रा काढली. या अंत्ययात्रेत कुटुंब आणि समाजातील लोक एकत्र आले. यावेळी अनेक महिला नाचत होत्या, लोक पैसे उडवत होते. एखाद्या लग्नाच्या वरातीसारख्या माहोलमध्ये त्या व्यक्तीची अंत्ययात्रा स्मशानभूमीत पोहोचली.
या अंत्ययात्रेतबद्दल विचारले असता ते म्हणाले की, आमचे पूर्वज युद्धाच्या वेळी मृत्यू उत्साहाने साजरा करायचे. आमच्या स्त्रियादेखील युद्धानंतर जौहर करण्यापूर्वी मोठ्या उत्साहाने नृत्य करुन स्वतःला अग्नीत झोकून द्यायच्या. सध्या जौहर आणि सती प्रथा पूर्णपणे बंद झाली आहे. पण, आता ही प्रथा वेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते.