बरेलीतील खांदेपालट भाजपला परवडणार का?; ८ टर्म खासदार असलेल्या नेत्याला घरी बसवलं
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 06:07 AM2024-04-26T06:07:59+5:302024-04-26T06:08:26+5:30
इंडिया आघाडीकडून बरेलीसाठी प्रवीण सिंह ऐरन यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे
संतोष सूर्यवंशी
बरेली : यंदा भाजपनं बरेली लोकसभा मतदारसंघातून तब्बल आठ टर्म खासदार असलेल्या माजी केंद्रीय मंत्री संतोष गंगवार यांना उमेदवारी नाकारत छत्रपाल सिंह गंगवार यांना दिली आहे. २००९ चा अपवाद वगळता संतोष गंगवार १९८९ पासून बरेली लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडून येत आहेत. यंदा भाजपचं हे खांदेपालट पक्षाला परवडणार का, असा प्रश्न निर्माण होत आहे.
इंडिया आघाडीकडून बरेलीसाठी प्रवीण सिंह ऐरन यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. २००९ साली ऐरन यांनी संतोष गंगवार यांची सद्दी संपूष्टात आणत या ठिकाणी काँग्रेसला विजय मिळवून दिला होता. परंतु त्यानंतर पुन्हा एकदा संतोष गंगवार यांनी २०१४ व २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत गत वैभव मिळवलं होतं. बरेलीमध्ये ७ मे रोजी मतदान होणार आहे.
निवडणुकीतील कळीचे मुद्दे
बांबूपासून तयार अनेक हस्तकलांसाठी बरेली प्रसिध्द आहे. परंतु याला पाहिजे तसे जागतिक मार्केट मिळालेलं नाही. बरेलीत ३५ टक्के मुस्लिम मतदार असून ही एकगठ्ठा मते कोणाच्या पारड्यात पडतात, यावर विजयाचे समिकरण राहिल. संतोष गंगवार यांनी आठ वेळा बरेली लोकसभेचे प्रतिनिधीत्व करुनही त्यांना यंदा उमेदवारी नाकारल्याने याचा परिणामही निवडणुकीवर दिसेल.
२०१९ मध्ये काय घडले?
संतोष गंगवार
भाजप (विजयी)
५,६५,२७०
भगवत सरन गंगवार
सपा (पराभूत)
३,९७,९८८