महिलेने आपल्याच लहान बहिणीशी लावले पतीचे दुसरे लग्न; अनोख्या लग्नाची चर्चा...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2023 05:29 PM2023-06-25T17:29:53+5:302023-06-25T17:30:47+5:30
या लग्नात कुटुंबातील इतर सहस्यांसह गावातील लोकही आले होते.
नवऱ्याने आपल्याशिवाय दुसऱ्या महिलेचा विचारही करू नये, अशी प्रत्येक महिलेची इच्छा असते. पण, एका महिलेने आपल्या पतीचे दुसरे लग्न लावल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे, त्या महिलेने आपल्याच लहान बहिणीसोबत पतीचे लग्न लावले. या अनोख्या लग्नात इतर कुटुंबियही सहभागी झाले होते. ही घटना उत्तर प्रदेशच्या प्रयागराजची आहे.
जिल्ह्यातील शंकरगड परिसरातील हा अनोखा विवाह पार पडला. येथील रहिवासी असलेला राजकुमार मजुरीचे काम करतो. रुमी नावाच्या तरुणीशी त्याचे लग्न झाले होते. रुमीचे तिच्या धाकट्या बहिणीवर खूप प्रेम आहे आणि त्या दोघी एकमेकींपासून दूर राहू शकत नाहीत. तसेच, धाकटी बहीण भारतीचे लग्न लावण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसेही नव्हते. म्हणूनच रुमीने पती राजकुमारला राजी केले आणि भारतीचे त्याच्याशी मंदिरात लग्न लावून दिले.
गावातील एका मंदिरात हे लग्न झाले आणि या लग्नात कुटुंबातील इतर सदस्यही सहभागी झाले होते. लग्नानंतर राजकूमार आणि सवत झालेल्या सख्ख्या बहिणी आनंदाने घरी गेल्या. या लग्नामुळे राजकुमार आणि त्याची पहिली रुमी खूप आनंदी आहेत. रुमीही बहिणीच्या लग्नामुळे आलेल्या तणावातून मुक्त झाली आहे. हा अनोखा लग्नसोहळा संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय बनला आहे.