कारच्या छतावर उभं राहून नवरदेवाचा स्टंट; व्हिडीओ व्हायरल अन् SUV जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 02:25 PM2024-03-14T14:25:47+5:302024-03-14T14:27:28+5:30
गाडीवर बसून लग्नाचं फोटोशूट करणं नवरदेवाला चांगलंच भोवलं.
गाडीवर बसून लग्नाचं फोटोशूट करणं नवरदेवाला चांगलंच भोवलं. उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये चक्क गाडीवर उभं राहून व्हिडीओ काढल्याप्रकरणी पोलिसांनी नवरदेवावर कारवाई करण्यात आली. संबंधित घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये राष्ट्रीय महामार्गावर एका एसयूव्ही कारच्या छतावर नवरदेव उभा असल्याचे दिसते. हा प्रकार उत्तर प्रदेश पोलिसांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने कारवाई करत एसयूव्ही जप्त केली.
माहितीनुसार, अंकित नावाचा व्यक्ती सहारनपूरच्या भैला गावातून लग्नाची मिरवणूक घेऊन मेरठच्या कुशावली गावात जात होता. दिल्ली-देहरादून राष्ट्रीय महामार्गावर येताच नवरदेवाला गाठीच्या वरती उभं करून फोटोशूट सुरू होतं. वराचा हा स्टंट रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांचं लक्ष वेधत होता. पण ड्रोन कॅमेऱ्यानं केलेलं फोटोशूट सोशल मीडियावर शेअर करणं नवरदेवाला महागात पडलं. व्हिडीओ व्हायरल होताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि वराला स्टंट करताना पाहून फुलांनी सजवलेली गाडी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणली. महामार्गावर पुन्हा स्टंट करू नका, असा सल्ला देऊन पोलिसांनी वऱ्हाडी मंडळीला देऊन गाडी परत केली.
व्हिडीओ व्हायरल अन् कारवाई
स्थानिक पोलिसांनी सांगितलं की, आम्हाला एक नवरदेव गाडीवर उभा राहून स्टंट करत असल्याची माहिती मिळाली. व्हिडीओ देखील आम्ही पाहिला. मग राष्ट्रीय महामार्ग ५८ वरील नवरदेवाची मिरवणूक थांबवण्यात आली आणि गाडी जप्त केली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. स्टंटबाजीमुळं नवरदेवाला नेण्यासाठी फुलांनी सजवलेली गाडी पोलीस ठाण्यात अडकली. त्यामुळं जागीच दुसऱ्या गाडीची व्यवस्था करून वरासह लग्नाची मिरवणूक वधूच्या घराकडे न्यावी लागली.