पती मतिमंद, बंदुकीचा धाक दाखवून सासरा करतो 'असे' कृत्य, पीडितेनं पोलिसांकडे मागितली मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2023 10:19 AM2023-06-15T10:19:43+5:302023-06-15T10:20:06+5:30
"सासरा माझ्याकडे वाईट दृष्टीने पाहतो. एक दिवस मी माझ्या रूममध्ये झोपली असताना सासरा माझ्या रूममध्ये आला अन्..."
उत्तर प्रदेशातील बांदा येथून एका नवविवाहितेचा हुंड्यासाठी छळ केला गेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी, संबंधित नवविवाहितेने सासरच्या लोकांकडून छळ होत असल्याचा आरोप करत बांदा एएसपींकडे मदत मगितली आहे. आपला पती मतिमंत आहे. सासरा जबरदस्ती माझ्या रूममध्ये येतो आणि बंदुकीचा धाक दाखवत छेडछाड करतो. हात पकडतो. पती मानसिक दृष्ट्या कमकुवत असल्याने काही बोलत नाही, असे पीडितेने म्हटले आहे.
हे प्रकरण बांदामधील एका गावातील आहे. नवविवाहितेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तिचे लग्न 6 मे रोजी जिल्यातील पैलानी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाले होते. यावेळी वडिलांनी त्यांच्या क्षमतेहून अधिक हुंडा दिला होता. मात्र आपण सासरी पोहोचताच सासरच्या लोकांनी सोन्याची चेन आणि बाइक मागायला सुरुवात केली. मात्र ते न मिळता त्यांनी छेडछाड करायला सुरुवात केली.
लग्नानंतर कळले पती मतिमंद -
नवविवाहितेने सांगितले की, तिला आपला पती मंदबुद्धी आहे, हे लग्नानंतर समजले. लग्नापूर्वी, ही गोष्ट माझ्यापासून आणि माझ्या कुटुंबीयांपासून लपवण्यात आली होती. मी जेव्हा माझ्या माहेरी परतले, तेव्हा माज्या कुटुंबालाही यासंदर्भात सांगितले होते.
सासरा वाईट दृष्टीने पाहतो -
पीडितेने एसपींना दिलेल्या माहितीनुसार, पति मतिमंद असल्याने सासरा माझ्याकडे वाईट दृष्टीने पाहतो. एक दिवस मी माझ्या रूममध्ये झोपली असताना सासरा माझ्या रूममध्ये आला. त्याने रूम आतून बंद केली आणि बंदुकीचा धाक दाखवून वाइट पद्धतीने स्पर्ष करू लागला.
पीडितेने म्हटल्यानुसार, तिने जेव्हा सासऱ्यांना विरोध केला, तेव्हा त्याने तिचे तोंड दाबून, या घरात राहायचे असेल, तर मी म्हणतो ते करावे लागेल, असे म्हणाला. यानंतर हा संपूर्ण प्रकार मी पतीला सांगितला, मात्र त्यांच्यावर कुठलाही परिणाम झाला नाही.
पोलिसांनी नोंदवली तक्रार -
या प्रकरणी ASP लक्ष्मी निवास मिश्र यांनी पीडितेला मदतीचे आश्वासन दिले आहे. याप्रकरणी त्यांनी संबंधित पोलीस ठाण्याला गुन्हा दाकल करण्याचे आदेश दिले आहेत. पीडितेच्या तक्रारीवरून तिच्या सासरच्या एकूण पाच लोकांवर छेडछाड, 498 A, हुंडा प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासू सुरू असून गुन्हेगारांवर कडक कारवाई केली जाईल, असे पोलीस ठाण्याचे प्रमुख जयचंद यांनी म्हटले आहे.