ग्रामसेवकाला महिलेकडून चपलेनं मारहाण, उचलून आपटलं; दाम्पत्यास अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2024 11:50 AM2024-01-07T11:50:33+5:302024-01-07T12:04:14+5:30
सरपंचांसह आरोपी महिला व तिच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.
उत्तर प्रदेशातील बांदा येथे पंचायत भवनच्या समोर एका महिलेने आपल्या पतीसोबत ग्रामसेवकाला बेदम मारहाण केली. महिलेने या ग्रामसेवकांना चप्पलीने मारहाण करत, उचलून उचलून आदळलं. ग्रामसेवकाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सरपंचांसह आरोपी महिला व तिच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.
महुआ तालुक्यातील खरोंच गावातील ही घटना असून ग्रामसेवक रोहित पटेल यांच्यासोबत ही घटना घडली. रोहित हे सरकारी कामानिमित्त गावागावात फिरत होते. यावेळी, ग्रामपंचायतीमध्ये साफ-सफाई करणारी महिला रेखा आणि त्यांचा पती, हे दोघेही तेथे आले होते. महिलेने गेल्या ४ महिन्यातील आपल्या कामाचे पैसे मागितले होते. त्यातूनच महिला व ग्रामसेवक यांच्यात शाब्दीक वाद सुरू झाला.
शब्दाने शब्द वाढून शाब्दीक वादातील वाद मारहाणीवर पोहोचला. त्यावेळी, महिलेने पतीसमवेत ग्रामसेवकास जबर मारहाण केली. यावेळी, चप्पलेने मारहाण करत उचलून खाली आपटले. त्यामुळे, ग्रामसेवक पोलीस ठाण्यात पोहचले आणि त्यांनी दाम्पत्याविरुद्ध फिर्याद दिली. मी सरकारी काम करत असताना माझ्यासोबत मारहाण करण्यात आल्याचे पटेल यांनी फिर्यादीत म्हटले आहे. ग्रामपंचायतीमध्ये मी काम करत असताना, सरपंच आणि एक दाम्पत्य येथे आले. त्यांनी माझ्याकडे पैशाची मागणी केली. त्यानंतर, मला शिवीगाळ करत मारहाणही केली. माझे कपडेही फाडल्याचंही ग्रामसवेकाने तक्रारीत म्हटलं आहे. दरम्यान, मी ग्रामपंयातमधील साफ-सफाईचं काम करत असून मला माझ्या मजुरीचे पैसे मिळत नसल्याने मी मारहाण केल्याचं महिलेने म्हटले आहे.
याप्रकरणी, डीएसपी अम्बुजा त्रिवेदी यांनी म्हटलं की, पोलीस ठाणे नरौनी हद्दीतील ग्रामपंचायत खरोंच येथील ग्रामसेवक रोहित यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यामध्ये, एका दाम्पत्याकडून त्यांना मारहाण झाल्याचं त्यांनी तक्रारीत म्हटलं. या घटनेचा व्हिडिओ प्राप्त झाला असून याप्रकरणी महिला व तिच्या पत्नीला अटक करण्यात आली आहे. त्यानुसार, पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याचं डीएसपींनी सांगितलं.