श्रीराम मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठेसाठी येणारे पाहुणे लखनौमध्ये थांबणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 06:11 AM2023-12-18T06:11:17+5:302023-12-18T06:11:30+5:30

२० ते २३ जानेवारीपर्यंत ॲडव्हान्स बुकिंग करू नका; लखनौच्या मोठ्या हॉटेल्सना सूचना

Visitors coming for Shri Ram Mandir idol Pranpratistha will stay in Lucknow | श्रीराम मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठेसाठी येणारे पाहुणे लखनौमध्ये थांबणार

श्रीराम मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठेसाठी येणारे पाहुणे लखनौमध्ये थांबणार

- राजेंद्र कुमार
लोकमत न्यूज नेटवर्क
लखनौ : अयोध्येतील श्रीराम मंदिरातील मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त जसजसा जवळ येत आहे, तसतशी उत्तर प्रदेश सरकारसमोरील व्यवस्थेची आव्हाने वाढत आहेत. श्रीराम मंदिराच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा समारंभात सहभागी होणाऱ्या देशभरातून येणाऱ्या अतिथींना कुठे ठेवायचे, हे सध्या सरकारसमोर सर्वांत मोठे आव्हान आहे.

  लाखो लोक २२ जानेवारीच्या प्राणप्रतिष्ठा समारंभात सहभागी होऊ इच्छित आहेत. श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने यासाठी ८ हजार अतिविशिष्ट मान्यवरांना आमंत्रित केले आहे. त्यांना अयोध्येत राहण्याची जागा कमी पडत आहे. याचमुळे या अतिथींमधील शेकडो पाहुण्यांची लखनौत राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासाठी मोठ्या हॉटेल्समध्ये २० ते २३ जानेवारीपर्यंत कोणत्याही प्रकारची ॲडव्हान्स बुकिंग करू नये, असे सांगण्यात आले आहे.

व्यवस्थेसाठी प्रशासनाची कसरत
nश्रीराम मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी येणाऱ्या अति विशिष्ट अतिथींच्या राहण्याची व्यवस्था कोठे करावी, एवढीच समस्या सरकारपुढे नाही. त्यांची सुरक्षा, वाहनांच्या पार्किंगबाबतची तयारी सुरू आहे.
n२२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत असणार आहेत.
nकोठेही वाहतुकीची कोंडी होऊ नये. त्या कालावधीत अयोध्येत दाखल होणाऱ्या लोकांनी मंदिराकडे जाण्याने अडचणी निर्माण होऊ नये, याचेही नियोजन केले जात आहे.
nयासाठी कोणत्या ठिकाणी किती पोलिस बंदोबस्त ठेवण्यात यावा, हेही ठरवले जात आहे. याशिवाय देशभरातून अयोध्येत दाखल होणाऱ्या ५०० पेक्षा अधिक साधू-संतांच्या थांबण्याची व्यवस्था केली जात आहे.
nपंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या थांबण्याची व सुरक्षेची व्यवस्था करण्यात राज्याचे अधिकारी, एसपीजीचे अधिकारी सध्या गुंतले आहेत.

Web Title: Visitors coming for Shri Ram Mandir idol Pranpratistha will stay in Lucknow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.