“हिंदुंचे रक्षण तुम्हीच करु शकता”; योगींच्या जनता दरबारात आली बंगाली जनता, गाऱ्हाणे मांडले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2023 04:30 PM2023-10-05T16:30:09+5:302023-10-05T16:33:42+5:30
CM Yogi Adityanath Janta Darbar: योगी आदित्यनाथ यांच्या जनता दरबारात चक्क पश्चिम बंगालमधील काही लोकांनी उपस्थिती लावत तेथील स्थानिक समस्या मांडत त्या सोडवण्याची विनंती केली.
CM Yogi Adityanath Janta Darbar: देशातील अनेक नेते, मंत्री आपापले मतदारसंघ आणि परिसरातील समस्या, तक्रारी जाणून घेऊन त्याचे निराकरण करण्यासाठी, जनतेला मदत करण्यासाठी जनता दरबार घेतात. यामध्ये जनता आपापल्या समस्यांवर उपाय मिळावा, मदत व्हावी, अशा अपेक्षेने जात असतात. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जनता दरबारात पश्चिम बंगालमधील काही लोक आले होते. या ठिकाणी त्यांनी समस्या मांडत, त्याचे निराकरण करण्याची विनंती केली. तसेच हिंदुंचे रक्षण तुम्हीच करू शकता, असे म्हटले.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशमधील लखनऊ येथे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा जनता दरबार होता. पश्चिम बंगालमधील काही हिंदू लोकांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे तक्रार केली की, त्यांच्या जमिनी गुंडांनी बळकावल्या आहेत. त्यांना धमक्या दिल्या जातात. या प्रकरणावर सीएम योगी म्हणाले की, तुमच्या राज्याचा मुख्यमंत्री मी नाही. दुसरे कोणी आहे. यावर बंगाली लोक म्हणाले की, हिंदुंचे रक्षण तुम्हीच करू शकता.
सनातन धर्मावर बोलणाऱ्यांना योगींनी होते सुनावले
अलीकडेच योगी आदित्यनाथ यांनी सनातन धर्माविरोधात बोलणाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. सनातन ना बाबराच्या मिटवू शकला ना रावण. मग आता सत्तेत असलेले सनातन कसा मिटवणार? पूर्वीची सरकारे मुघल संग्रहालये बांधत असत. आम्ही संग्रहालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव दिले. त्यांना ना रामाची परंपरा आवडते ना कृष्णाची परंपरा. त्यांना भारताच्या समृद्ध वारसांचा अपमान करणे आवडते, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले होते.