ज्ञानवापीच्या तळघरात काय-काय सापडलं? ASI नं सीलबंद लिफाफ्यात सादर केला सर्वेक्षण अहवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 03:51 PM2023-12-18T15:51:20+5:302023-12-18T15:52:04+5:30
आज दुपारीच जिल्हा न्यायाधीश अजय कृष्ण विश्वेश यांच्या न्यायालयात हा अहवाल सादर करण्यात आला. अहवाल सादर करताना हिंदू पक्षाचे वकील विष्णू जैन यांच्यासह सर्व पक्षकार न्यायालयात उपस्थित होते. यावेळी शृंगार गौरीच्या वादी महिलाही उपस्थित होत्या.
काशीच्या प्रसिद्ध ज्ञानवापी मशीद प्रकरणी आज भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने (एएसआय) वाराणसीच्या जिल्हा न्यायालयात आपला सर्वेक्षण अहवाल सादर केला आहे. हा अहवाल पांढर्या सीलबंद लिफाफ्यात सादर करण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे, हा अहवाल सीलबंद लिफाफ्यात सादर करावा, अशी मागणी करणारी याचिका मुस्लीम पक्षाच्या वतीने यापूर्वीच न्यायालयात दाखल करण्यात आली होती. तसेच, प्रतिज्ञापत्राशिवाय कुणालाही हा अहवाल सार्वजनिक करण्याची परवानगी दिली जाऊ नये, अशी मागणीही मुस्लीम पक्षाकडून करण्यात आली होती.
आज दुपारीच जिल्हा न्यायाधीश अजय कृष्ण विश्वेश यांच्या न्यायालयात हा अहवाल सादर करण्यात आला. अहवाल सादर करताना हिंदू पक्षाचे वकील विष्णू जैन यांच्यासह सर्व पक्षकार न्यायालयात उपस्थित होते. यावेळी शृंगार गौरीच्या वादी महिलाही उपस्थित होत्या.
न्यायालयाकडे मागण्याच आला होता 3 आठवड्यंचा वेळ -
तत्पूर्वी, गेल्या 30 नोव्हेंबरला वाराणसी अथवा काशीच्या ज्ञानवापी मशिदीचा ASI सर्वेक्षण अहवाल दाखल करण्यासाठी ASI ने 3 आठवड्यांचा वेळ मागीतला होता. यावर न्यायाधीशांनी 10 दिवसांचा वेळ दिला होता. यानंतर ASI ने पुन्हा वेळ वाढून मागीतला होती. यानंतर अखेर आज एएसआयने आपला सर्वेक्षण अहवाल न्यायालयात सादर केला आहे.
सर्वेक्षणाची करण्यात आलीय व्हिडिओग्राफी -
न्यायालयाच्या आदेशानंतर, सुमारे 100 दिवस ज्ञानवापी मशिदीत सर्वेक्षण करण्यात आले. यावेळी दोन्ही पक्षाचे लोक, ASI सायंटिस्ट आणि स्थानिक प्रशासनातील लोक सहभागी झाले होते. सर्वेक्षणाची व्हिडिओग्राफीही करण्यात आली. आता सर्वेक्षणाचा अहवाल न्यायालयात सादर केल्यानंतर, ज्ञानवापी परिसर नेमके काय आहे हे समजू शकेल.