अतूट प्रेम! पतीच्या मृत्यूनंतर 2 तासांत पत्नीनेही सोडला जीव; एकाच चितेवर दोघांना मुखाग्नी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 01:03 PM2023-08-08T13:03:40+5:302023-08-08T13:10:06+5:30
एका महिलेला पतीच्या मृत्यूचा धक्का सहन झाला नाही आणि तिचाही 2 तासांनंतर मृत्यू झाला.
उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेला पतीच्या मृत्यूचा धक्का सहन झाला नाही आणि तिचाही 2 तासांनंतर मृत्यू झाला. एकाच वेळी दोन जणांचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांची वाईट अवस्था झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 50 वर्षीय प्रीतम रविवारी नेहमीप्रमाणे म्हैस घेऊन शेतात गेले होते. पावसाळ्यात बघौरा चेकडॅमचे पाणी शेतात येतं. प्रीतम जेव्हा शेतात गेले तेव्हा पाण्याची पातळी कमी होती.
आजूबाजूच्या भागात पाऊस झाल्याने पाण्याची पातळी अचानक वाढली. प्रीतम यांनी ही वस्तुस्थिती माहीत नव्हती. सायंकाळी परतत असताना चेकडॅमच्या पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. बराच वेळ होऊनही ते घरी न आल्याने नातेवाईक त्यांचा शोध घेण्यासाठी गेले. त्यानंतर चेकडॅमच्या बाजूला त्यांची चप्पल आढळून आल्याने याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. स्थानिक लोकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.
प्रीतम यांच्या मृत्यूची माहिती मिळताच कुटुंबावर शोककळा पसरली. दोन तासांनंतर प्रीतमच्या पत्नीचाही मृत्यू झाला. दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम होते, असे नातेवाईक सांगतात. त्यांना एक मुलगा आणि दोन मुली असून तिघंही विवाहित आहेत. काका उधम सिंह यांनी सांगितले की, प्रीतम रविवारी शेतात गेला होता. वाटेत असलेल्या चेक डॅममध्ये अचानक पाणी वाढले. त्यामुळेच तो चेकडॅमच्या पाण्यात बुडाला.
बराच वेळ ते घरी न आल्याने घरच्यांना काळजी वाटू लागली आणि त्यांनी शोधाशोध सुरू केली. चेकडॅमच्या काठावर प्रीतम यांची चप्पल सापडली. त्यानंतर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. तब्बल तीन तासांनंतर प्रीतम यांचा मृतदेह शोधण्यात यश आलं. आजारी असलेल्या 47 वर्षीय पत्नी गीता यांना मोठा धक्का बसला. पतीच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती, त्याचवेळी पत्नीचाही मृत्यू झाला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.