बदललेला उमेदवार अडचणीचा ठरणार? जितीन प्रसाद यांना इतिहास घडविण्याची संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2024 07:56 AM2024-04-14T07:56:04+5:302024-04-14T07:58:21+5:30

नेपाळ आणि उत्तराखंडच्या सीमेला लागून असलेला पिलीभीत लोकसभा मतदारसंघ सध्या उत्तर प्रदेशच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.

Will a changed candidate be a problem A chance for Jitin Prasad to make history | बदललेला उमेदवार अडचणीचा ठरणार? जितीन प्रसाद यांना इतिहास घडविण्याची संधी

बदललेला उमेदवार अडचणीचा ठरणार? जितीन प्रसाद यांना इतिहास घडविण्याची संधी

ललित झांबरे, लोकमत न्यूज नेटवर्क 
पिलीभीत
: नेपाळ आणि उत्तराखंडच्या सीमेला लागून असलेला पिलीभीत लोकसभा मतदारसंघ सध्या उत्तर प्रदेशच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलाय.  एरवी हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाचा गड मानला जातो; पण यावेळी भाजपसाठी पिलीभीतची लढत वाटते तेवढी सोपी नाही कारण भाजपने विद्यमान खासदार वरुण गांधी यांच्या ऐवजी जितीन प्रसाद यांना रिंगणात उतरवले आहे. वरुण हे  दोन वेळा तर मनेका गांधी ह्या पिलीभीतच्या सहा वेळा खासदार राहिल्या आहेत. मात्र  त्यांच्याऐवजी वेगळाच चेहरा दिल्याने भाजपासाठी ही लढत सोपी नसेल.

 याची कल्पना आहे म्हणूनच १० वर्षांत प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  पिलीभीत येथे प्रचारसभा घेतली. त्या सभेला गांधी मायलेक उपस्थित नव्हते.  पिलीभीत येथे समाजवादी पार्टीने जातीच्या समीकरणांना डोळ्यासमोर ठेवून भगवतशरण गंगवार यांना मैदानात उतरवले आहे. तेसुद्धा बाहेरच्या जिल्ह्यांतील म्हणजे बरेलीतील नवाबगंजचे आहेत. त्यांचे जातीचे कार्ड निष्प्रभ ठरविण्यासाठी भाजपाकडून संजय गंगवार हे राज्यमंत्री जोमाने प्रचारात उतरले आहे. बहुजन समाज पार्टीने साधारण २६ टक्के मुस्लीम मतदार बघता अनिस अहमद यांना उमेदवारी दिली आहे.  या मतदारसंघात ४.५ लाख मुस्लीम, ३.५ लाख लोधी, २.७५ लाख अनुसूचित जातीचे आणि साधारण अडीच लाख कूर्मी मतदार आहेत.

निवडणुकीतील कळीचे मुद्दे

  1. १९९६ नंतर प्रथमच येथे मनेका गांधी किंवा वरुण गांधी उमेदवार नाही.  या मायलेकांशी पिलीभीतच्या नागरिकांचे वेगळेच भावनिक नाते आहे. त्याला यावेळी धक्का पोहोचलेला आहे. 
  2. जितीन प्रसाद हे योगी सरकारमध्ये मंत्री असले तरी आधी ते काँग्रेसमध्ये होते. ते मूळ भाजपावासी नाहीत, पिलीभीतचेही नाहीत, तर शेजारच्या शहाजहाँपूर जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे स्थानिकांना ते बाहेरचेच वाटतात.
  3. बहुजन समाज पार्टीचे अनिस अहमद हे मुस्लीम मतदारांचे किती मते खेचतात, त्यावर राजकीय समीकरण अवलंबून असेल. येेथे २६ टक्के मुस्लीम मतदार आहेत. 

एकूण मतदार    १७,३०,६२८

  • पुरुष - ९,३४,७३७
  • महिला - ७,९५,८२५

२०१९ मध्ये काय घडले?
वरुण गांधी भाजप ७,०४,५४९ (विजयी)
हेमराज वर्मा समाजवादी पार्टी ४,४८,९२२ 

२०१९ पूर्वी कोणाची बाजी?
वर्ष    विजयी उमेदवार    पक्ष    मते     

२०१४        मनेका गांधी     भाजप    ५४६९३४
२००९    वरुण गांधी     भाजप    ४१९५३९
२००४    मनेका गांधी    भाजप    २५५६१५
१९९९    मनेका गांधी    अपक्ष    ४३३४२१
१९९८    मनेका गांधी    अपक्ष    ३९०३८१

Web Title: Will a changed candidate be a problem A chance for Jitin Prasad to make history

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.