धक्कादायक! घराबाहेर लघवी केल्याने वाद; महिलेसह आरोपींनी पीडितेच्या प्रायव्हेट पार्टवर रॉडने वार केले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2023 19:45 IST2023-12-17T19:44:38+5:302023-12-17T19:45:03+5:30
उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

धक्कादायक! घराबाहेर लघवी केल्याने वाद; महिलेसह आरोपींनी पीडितेच्या प्रायव्हेट पार्टवर रॉडने वार केले
शाहजहांपूर : उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे शुल्लक कारणावरून आरोपींनी जे केलं ते पाहून पोलिसही चकित झाले. खरं तर घराबाहेर नाल्यावर लघवी करणाऱ्या महिलेचा काही लोकांशी वाद झाला. महिलेने नाल्यावर लघवी केली म्हणून आरोपींनी महिलेच्या प्रायव्हेट पार्टवर क्रॉस रॉडने हल्ला केला. या घटनेत पीडित महिला जखमी झाली. मग कुटुंबीयांनी तिला बेशुद्ध अवस्थेत जवळच्या इस्पितळात दाखल केले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रकरणाचा तपास सुरू केला.
वरिष्ठ पोलीस अधिकारी व्हीएस वीर कुमार यांनी याप्रकरणी सांगितले की, रामचंद्र मिशन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रुद्रपूर गावात राहणारी ३५ वर्षीय महिला घराजवळील नाल्याजवळ लघवी करत होती. तेवढ्यात समोरच्या घरातील एक महिला तिच्याशी वाद घालू लागली आणि शिवीगाळ करू लागली. काही वेळातच हे प्रकरण हाणामारीत गेले. त्यानंतर आरोपी महिला आणि तिचा पती (गुरूदेव) काठी घेऊन आला आणि मारहाण करू लागला. आरोपींनी पीडितेच्या प्रायव्हेट पार्टवर रॉडने अनेक वार केले. त्यामुळे ती गंभीर जखमी झाली.
घराबाहेर लघवी केल्याने वाद...
दरम्यान, घटनेनंतर पीडितीचे कुटुंबीय घरी आले असता त्यांना ती बेशुद्धावस्थेत आढळली. त्यानंतर त्यांनी घाईघाईने तिला घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेतली, जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गुरुदेव, राजीव आणि गुरुदेव यांच्या पत्नीवर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला आहे.