योगी सरकारचा मोठा निर्णय! वर्षभरात २ सिलिंडर देणार मोफत; दिवाळीपासून होणार सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 10:25 AM2023-10-17T10:25:43+5:302023-10-17T10:25:52+5:30

उत्तर प्रदेश निवडणुकीत भाजपने मोफत सिलिंडर देण्याची घोषणा केली होती. त्याची आता अंमलबजावणी केली जात आहे.

yogi adityanath govt ready to give two free gas cylinders in a year starting from diwali 2023 | योगी सरकारचा मोठा निर्णय! वर्षभरात २ सिलिंडर देणार मोफत; दिवाळीपासून होणार सुरुवात

योगी सरकारचा मोठा निर्णय! वर्षभरात २ सिलिंडर देणार मोफत; दिवाळीपासून होणार सुरुवात

Yogi Adityanath Govt: मागील निवडणुकीदरम्यान भाजपने जाहीरनाम्यात महिलांना वर्षभरात दोन मोफत सिलिंडर देण्याची घोषणा केली होती. आता सुमारे दीड वर्षांनी या घोषणेची अंमलबजावणी केली जाणार आहे. उत्तर प्रदेशच्या मुख्य सचिवांनी या योजनेशी संबंधित प्रस्तावावर विभागीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आवश्यक मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता दिवाळीपासून वर्षभरात दोन सिलिंडर मोफत दिले जाऊ शकतात, असे सांगितले जात आहे. 

उत्तर प्रदेशमध्ये उज्ज्वला योजनेअंतर्गत सुमारे ०१ कोटी ७५ लाख गॅस कनेक्शन आहेत. यावेळी दिवाळीच्या निमित्ताने प्रथमच मोफत सिलिंडरचे पैसे या गॅस कनेक्शनधारकांच्या खात्यावर थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच डीबीटीद्वारे पाठवले जाणार आहेत. लखनऊमध्ये मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयापूर्वी मुख्य सचिवांना याबाबतची माहिती देण्यात आली आहे. तसेच योगी सरकारने निधीची तरतूद केली आहे.  या प्रस्तावावर लवकरच मंत्रिमंडळाची मान्यता घेण्यात येणार आहे.

महिला लाभार्थ्यांना दिवाळीपूर्वी मोफत एलपीजी सिलिंडर

उज्ज्वला योजनेच्या महिला लाभार्थ्यांना दिवाळीपूर्वी मोफत एलपीजी सिलिंडर देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच होळीच्या दिवशी मोफत सिलिंडरही देण्यात येणार आहे. मागील विधानसभा निवडणुकीवेळी भाजपने जाहीरनाम्यात उज्ज्वला योजनेच्या महिला लाभार्थ्यांना होळी आणि दिवाळीला मोफत एलपीजी सिलिंडर देण्याची घोषणा केली होती. यासाठी मागील वर्षी होळी आणि दिवाळीच्या दिवशी उज्ज्वला लाभार्थ्यांना मोफत गॅस सिलिंडर देण्यासाठी अंदाजपत्रकात ३३०० कोटींहून अधिक रुपयांची तरतूद करण्यात आली होती.


 

Web Title: yogi adityanath govt ready to give two free gas cylinders in a year starting from diwali 2023

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.