योगी सरकारची अतिक अहमदवर कारवाई! कोट्यवधींची मालमत्ता सरकारी म्हणून घोषित होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2023 09:31 PM2023-06-30T21:31:40+5:302023-06-30T21:40:11+5:30

योगी सरकारने अतिक अहमद विरोधात मोठी कारवाई केली आहे.

Yogi government's action against Atiq Ahmed! Property worth crores will be declared as Govt | योगी सरकारची अतिक अहमदवर कारवाई! कोट्यवधींची मालमत्ता सरकारी म्हणून घोषित होणार

योगी सरकारची अतिक अहमदवर कारवाई! कोट्यवधींची मालमत्ता सरकारी म्हणून घोषित होणार

googlenewsNext

उत्तर प्रदेशमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसापूर्वी माफिया अतिक अहमद याची हत्या झाली. आता अतिक अहमदच्या प्रॉपर्टी संदर्भात योगी सरकारने मोठी कारवाई केली आहे.  अतिक अहमदची जप्त केलेली मालमत्ता लवकरच सरकारी मालमत्ता घोषित करण्याच्या तयारीत आहे. कोट्यवधींची मालमत्ता माफिया अतिकवर गँगस्टर कायद्यातील कारवाईत जप्त करण्यात आली. प्रयागराज पोलिसांनीही यासाठी तयारी सुरू केली आहे. गँगस्टर अॅक्टच्या कलम १६ आणि १७ मधील तरतुदींचा पोलीस आढावा घेत असून, अतिक अहमद आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर घेतलेल्या संपत्तीची लवकरच सरकारी मालमत्ता म्हणून नोंद होईल, असं बोलले जात आहे.

रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी पंतप्रधान मोदींना फोन केला, युक्रेन युद्धावर झाली चर्चा

पोलिसांनी आत्तापर्यंत अतिक आणि त्याची पत्नी शाइस्ता परवीन यांच्या नावे ३ अब्ज ४५ कोटी ४७ हजार रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. सरकारने संपूर्ण राज्यात गुन्हेगार आणि भूमाफियांविरोधात विशेष मोहीम राबवली होती. याअंतर्गत माफिया अतिक अहमदच्या गुन्ह्यातून हस्तगत केलेल्या सुमारे २० मोठ्या मालमत्ता गुंडाच्या कलम 14 (1) अंतर्गत जप्त करण्यात आल्या आहेत. पीपल गाव, झालवा, सिलना भिटी, दामोपूर, कासारी मासारी, चकिया, पुरमुफ्ती, झुशी, फुलपूर, सिव्हिल लाइन्स, लुकेर गंज, जसनसेन गंज, रोशन बाग, कौशांबी, धुमानगंज, प्रयागराज येथे अतिकची मालमत्ता आहे.

लखनौमध्येही अनेक मौल्यवान जमिनी आणि बांधकाम केलेले भूखंड गँगस्टर कायद्यांतर्गत जप्त करण्यात आले आहेत. माफिया अतिकची मौल्यवान जमीन आता सरकारच्या अखत्यारीत आल्यास सरकारला मोठा फायदा होणार आहे. या जमिनींवर सरकार गरिबांसाठी घरबांधणी योजना सुरू करू शकते किंवा जनतेच्या फायद्यासाठी इतर योजना करू शकते. अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ यांच्या हत्येनंतर अतीकची पत्नी शाइस्ता फरार असताना, यूपी सरकार या माफियांवर सातत्याने कारवाई करत आहे.

Web Title: Yogi government's action against Atiq Ahmed! Property worth crores will be declared as Govt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.