मिष्ठान्न खरेदी करताय? जरा जपून..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 10:56 PM2019-08-29T22:56:01+5:302019-08-29T22:56:48+5:30

नारळीपौर्णिमा आटोपली. गणेशोत्सव, ज्येष्ठा गौरींचे आगमन अवघ्या काही दिवसांवर आहे. यादरम्यान मिठाईला मोठी मागणी असते. बाजारेपेठेतील मिठाई विक्रेत्याकडून मिष्ठान्न खरेदी केली जाते. मात्र, हे खाद्यपदार्थ शुद्ध असेलच याची शाश्वती नाही. अनेक मिष्टान्न हे भेसळयुक्तच असते, असे निदर्शनास आले आहे.

- | मिष्ठान्न खरेदी करताय? जरा जपून..!

मिष्ठान्न खरेदी करताय? जरा जपून..!

googlenewsNext
ठळक मुद्देभेसळयुक्त पदार्थांची विक्री : गोदामात अस्वच्छतेत तयार होतात अनेक खाद्यपदार्थ

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सण-समारंभात मिठाई व तत्सम पदार्थांना मोठी मागणी असते. हे ओळखून खवय्यांकडून भेसळयुक्त मिठाई, खाद्यपदार्थ तयार केले जातात. भेसळयुक्त खाद्यपदार्थ, मिठाई सेवनामुळे गंभीर आजारांना सामारे जावे लागू शकते. याकरिता ग्राहकांनी सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.
शहरात शेकडोवर परप्रांतातील खवय्यांनी स्वीट मार्टची दुकाने थाटली आहेत. त्यांच्याकडून येथेच मिष्टान्न व इतर खाद्यपदार्थ तयार केले जातात. यात खोव्यापासूनही मिष्टान्न तयार केले जाते. वर्ध्यात खोव्याचे फारसे उत्पादन होत नसताना मिष्ठान्न वापरासाठी खोवा येतो कोठून, हा संशोधनाचा विषय ठरत आहे. नारळीपौर्णिमा आटोपली. गणेशोत्सव, ज्येष्ठा गौरींचे आगमन अवघ्या काही दिवसांवर आहे. यादरम्यान मिठाईला मोठी मागणी असते. बाजारेपेठेतील मिठाई विक्रेत्याकडून मिष्ठान्न खरेदी केली जाते. मात्र, हे खाद्यपदार्थ शुद्ध असेलच याची शाश्वती नाही. अनेक मिष्टान्न हे भेसळयुक्तच असते, असे निदर्शनास आले आहे. फरसाण तयार करताना भेसळयुक्त तेल, शिवाय एकाच तेलात अनेक प्रकारचे पदार्थ तळले जात असल्याने गुणवत्तेविषयी प्रश्न निर्माण होतो.
शहरातच अनेक विक्रेत्यांची खाद्यपदार्थ तयार करण्याची गोदामे आहेत. येथेही कमालीची अस्वच्छता असते, असे एका पाहणीत आढळून आले आहे.
खाद्यपदार्थ, मिष्ठान्न तयार करणाऱ्यांचा पोषाख अतिशय घाणेरडा असतो. खाद्यपदार्थ तयार करणाºयाची नियमित आरोग्य तपासणी करणे अनिवार्य आहे. मात्र, मिठाई विक्रेत्यांकडून या नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. याकडे अन्न व औषध प्रशासनाचाही कानाडोळा होत आहे.

वाटाण्यापासून तयार होते बेसण
शहरातील अनेक उपाहारगृहात खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी चण्याच्या डाळीऐवजी वाटाण्यापासून निर्मित भेसळयुतक्त बेसणाचा वापर होतो. मागील अनेक दिवसांपासून विक्रेत्यांचा हा गोरखधंदा सुरू असून ग्राहकांच्या डोळ्यात धूळ झोकली जात असल्याचे निदर्शनास आले आहे.

व्यावसायिकांकडील खाद्यपदार्थांची धडक तपासणी मोहीम राबविणार असून याअंतर्गत परवाना नूतनीकरण, नोंदणी आदी बाबी पडताळण्यासोबतच खाद्यपदार्थांचे देखील नमुने घेतले जाणार आहेत. व्यावसायिकांनी ऑनलाईन नोंदणी करीत परवाने प्राप्त करावे.
- रविराज धाबर्डे, अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन, वर्धा.

Web Title: -

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.