मांडवा येथे गणपती विसर्जन करीता गेलेल्या १ व्यक्तीसह दोन मुलांचा बुडून मृत्यू

By अभिनय खोपडे | Updated: September 9, 2022 18:36 IST2022-09-09T18:35:04+5:302022-09-09T18:36:13+5:30

मांडवा येथे  मोती नाल्यावरील बंधा-यात गणपती विसर्जन करीता गेलेल्या १ युवकासह  २ मुलांचा बुडुन मृत्यू झाल्याची घटना घडली. 

1 person and 2 children drowned in mandwa who had gone for ganapati immersion | मांडवा येथे गणपती विसर्जन करीता गेलेल्या १ व्यक्तीसह दोन मुलांचा बुडून मृत्यू

मांडवा येथे गणपती विसर्जन करीता गेलेल्या १ व्यक्तीसह दोन मुलांचा बुडून मृत्यू

अभिनय खोपडे 

आंजी (मोठी) (वर्धा) : मांडवा येथे  मोती नाल्यावरील बंधा-यात गणपती विसर्जन करीता गेलेल्या १ युवकासह २ मुलांचा बुडुन मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी ४ च्या सुमारास घडली.  मांडवा गावातील संदीप ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या घरच्या गणेशाचे विसर्जन करण्याकरीता  संदीप ज्ञानेश्वर चव्हाण (३२) ,  अथर्व सचीन वंजारी  (११ ), कार्तीक तुळशीराम बलवीर (११)  हे गेले  त्यांचा पाण्यात बुडुन मृत्यु झाला. मुल पाण्यात बुडत असल्याचे पाहून संदीप यांना काढण्यासाठी गेला पण संदीपला पोहता येत नसल्याने तोही पाण्यात बुडला. 

नाल्या पासुन काही अंतरावर नाल्या लगत अंतिम संस्कार सुरू असताना गणपती विसर्जनला गेलेले मुल डुबत असल्याने काही मुले आरडा ओरड करीत असल्याचे  काही लोकांना दिसल्याने लोकानी धाव घेत यांना बाहेर काढले. व रुग्णालयात घेऊन गेले असता डाक्टरांनी तिघांनाही मृत घोषित केले. उप पोलिस अधीक्षक,  सांवगी पोलीस स्टेशन चे ठाणेदार यांनी घटनास्थळी स्थळ गाढून पंचनामा केला.

Web Title: 1 person and 2 children drowned in mandwa who had gone for ganapati immersion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.