१०९ शेतकऱ्यांकडून सौर पंपाने सिंचन

By admin | Published: May 24, 2017 12:41 AM2017-05-24T00:41:31+5:302017-05-24T00:41:31+5:30

कोरडवाहू असलेल्या या भागात सिंचनाची सुविधा वाढविण्यावर शासनाकडून भर देण्यात येत आहे.

10 9 irrigation by farmers from solar pumps | १०९ शेतकऱ्यांकडून सौर पंपाने सिंचन

१०९ शेतकऱ्यांकडून सौर पंपाने सिंचन

Next

२६८ कृषी पंप मंजूर : १८६ शेतकऱ्यांनी भरली अनामत रक्कम
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरडवाहू असलेल्या या भागात सिंचनाची सुविधा वाढविण्यावर शासनाकडून भर देण्यात येत आहे. याकरिता कोरडवाहू शेती असलेल्या वर्धा जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यापूर्वी घडक सिंचन योजनेतून विहिरी देण्यात आल्या. यात आलेल्या पाण्याचे सिंचन करता यावे याकरिता सौर उर्जेवर चालणारे कृषी पंप शेतकऱ्यांना अनुदानावर देण्याचा निर्णय झाला. या योजनेचा लाभ घेत जिल्ह्यातील १०९ शेतकऱ्यांनी सौर कृषी पंप सुरू केले असून त्या माध्यमातून त्यांचे सिंचन सुरू असल्याची माहिती आहे.
जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून करण्यात आलेल्या मागणीनुसार २६८ सौर कृषी पंप मंजूर करण्यात आले आहेत. त्यापैकी १८६ शेतकऱ्यांनी त्यांनी केलेल्या अश्वशक्तीच्या कृषी पंपाला आवश्यक असलेले अनुदान महावितरणकडे भरले आहे. तर उर्वरीत शेतकऱ्यांकडून ते भरणे अद्याप बाकी आहे. ज्यांनी अनुदान भरले त्यापैकी १०९ शेतकऱ्यांच्या शेतात पंप उभरण्यात आले आहे. त्यांच्याकडून या माध्यमातून ओलीत करणे सुरू असल्याची माहिती आहे. असे असले तरी जिल्ह्यात प्रारंभी देण्यात आलेल्या उद्दिष्टापासून जिल्हा अद्याप दूरच असल्याचे दिसून येत आहे.
शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा असलेल्या वर्धेत सिंचन करताना शेतकऱ्यांना भरनियमनाचा खोडा पडू नये म्हणून पहिल्या टप्यात ९२० सौर कृषी पंप देण्याचा निर्णय झाला होता. मात्र या योजनेची पाहिजे त्या प्रमाणात प्रसिद्धी झाली नसल्याने शेतकऱ्यांकडून याकरिता पाहिजे त्या प्रमाणात अर्ज आले नाही. परिणामी ही योजना रखडली. योजना सुरू होवून दोन वर्षाचा कालावधी होत आहे. असे असताना केवळ १०९ शेतकऱ्यांकडेच हे कृषी पंप लागले आहेत. यामुळे योजनेचा लाभ घेण्याकरिता तिची आणखी प्रसिद्धी होणे गरजेचे असून याकडे महावितरणने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

८२ शेतकऱ्यांची अर्जानंतर माघार
सौर कृषी पंपाकरिता अर्ज करून तो मंजूर झाल्यानंतर जिल्ह्यातील तब्बल ८२ शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घेण्याकरिता माघार घेतल्याचे दिसून आले आहे. महावितरणकडे या पंपांकरिता तब्बल २६८ शेतकऱ्यांनी अर्ज केले. त्या अर्जांची छाणणी करून स्पॉट व्हेरीफिकेशन करून पंप मंजूर करण्यात आले. यातील १८६ शेतकऱ्यांनी आवश्यक अनामत रक्कम भरली. मात्र ८२ शेतकऱ्यांनी माघार घेतली. त्यांनी माघार घेण्याचे कारण मात्र कळू शकले नाही.
अश्वशक्तीनुसार अनामत रकमेत फरक
शेतकऱ्यांना देण्यात येत असलेल्या सौर कृषी पंप तीन प्रकाराच्या अश्वशक्तीचे आहेत. या योजनेत तीन अश्वशक्तीच्या पंपाकरिता २० हजार, पाच अश्वशक्तीच्या पंपाकरिता २७ हजार आणि साडेसात अश्वशक्तीच्या पंपाकरिता ३६ हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागत आहे. ही रक्कम कमी करावी अशी मागणी काही शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

 

Web Title: 10 9 irrigation by farmers from solar pumps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.