अळ्यायुक्त जेवणामुळे १० विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली; महात्मा गांधी आंतराष्ट्रीय हिंदी विश्व विद्यापीठातील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2022 11:43 AM2022-10-17T11:43:16+5:302022-10-17T11:44:54+5:30

येत्या ७२ तासांत याविषयी ठोस निर्णय घेण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही विद्यार्थ्यांनी दिला.

10 students' health worsened due to meal containing maggots in Mahatma Gandhi Antarrashtriya Hindi Vishwavidyalaya | अळ्यायुक्त जेवणामुळे १० विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली; महात्मा गांधी आंतराष्ट्रीय हिंदी विश्व विद्यापीठातील प्रकार

अळ्यायुक्त जेवणामुळे १० विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली; महात्मा गांधी आंतराष्ट्रीय हिंदी विश्व विद्यापीठातील प्रकार

Next

वर्धा : येथील महात्मा गांधी आंतराष्ट्रीय हिंदी विश्व विद्यालयाच्या वसतिगृहातील दहा विद्यार्थ्यांची प्रकृती अळ्यायुक्त जेवणामुळे खालावल्याने त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. व्यवस्थापनाकडे वारंवार तक्रार करूनही चांगले जेवण देण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करत हिंदी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत घोषणाबाजी केली.

शनिवारी रात्रीच्या जेवणानंतर महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयातील काही विद्यार्थ्यांची प्रकृती अचानक खालवली व त्यांना उलट्या होऊ लागल्याने तब्बल दहा विद्यार्थ्यांना तातडीने सेवाग्राम येथील रुग्णालयात हलविण्यात आले. अळ्यायुक्त जेवणामुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप करत २००हून अधिक विद्यार्थ्यांनी एकत्र येत रात्री २ वाजेपर्यंत आंदोलन करत आपला रोष व्यक्त केला. शिवाय जेवण पुरवठ्याचे कंत्राट असलेल्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. येत्या ७२ तासांत याविषयी ठोस निर्णय घेण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही विद्यार्थ्यांनी दिला.

विद्यापीठ प्रशासन म्हणते चौकशीअंती कारवाई

हिंदी विश्वविद्यालयातील मेसमध्ये अळ्यायुक्त जेवन मिळत असल्याने विद्यार्थ्यांची प्रकृती खालावत असून विद्यापीठ प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप वसतीगृहातील विद्यार्थ्यांनी केला. याप्रकरणी लवकरात लवकर कारवाई न केल्यात मंगळवारपासून आंदोलन करण्याचा निर्णय विद्यार्थ्यांनी घेतला. या संदर्भात विद्यापीठ प्रशासनाला विचारले असता चौकशीअंती निर्णय घेतला जाईल असे सांगण्यात आले.

Web Title: 10 students' health worsened due to meal containing maggots in Mahatma Gandhi Antarrashtriya Hindi Vishwavidyalaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.