वर्धा जिल्ह्यात १०२ कोंबड्यांचा मृत्यू; कारण अनभिज्ञ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 01:06 PM2021-01-20T13:06:38+5:302021-01-20T13:07:00+5:30
Wardha News कारंजा घाडगे तालुक्यातील धानोली येथील शेतकरी बुद्धेश्वर पाटील यांच्या शेतामधील १०२ कोंबड्या मेलेल्या अवस्थेत आढळून आल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: कारंजा घाडगे तालुक्यातील धानोली येथील शेतकरी बुद्धेश्वर पाटील यांच्या शेतामधील १०२ कोंबड्या मेलेल्या अवस्थेत आढळून आल्या आहेत. याबाबत अनेक शंका-कुशंका निर्माण होत असल्या तरी ज्या शेडमध्ये कोंबड्या ठेवलेल्या होत्या त्या शेडच्या जाळीला छिद्र आहेत त्यामुळे कदाचित शेडमधून मुंगूस जाऊन मुंगसाने त्या कोंबड्या खाल्ल्या असाव्यात अशी शंका बुद्धेश्वर पाटील यांनी वर्तविली आहे. सध्या बर्ड फ्ल्यूची सर्वत्र भीती असल्याने मेलेल्या कोंबड्यांचे रिपोर्ट मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.
याबाबत पशु वैद्यकीय अधिकारी मुकुंद जोगळेकर यांना विचारले असता त्यांनी सांगितले की ह्या कोंबड्या कशाने मेल्या हे सध्या पुण्यावरून रिपोर्ट आल्याशिवाय निश्चित सांगता येणार नाही, रिपोर्ट येण्याकरिता दोन ते तीन दिवस लागतील असे सांगितले.