तालुक्यातील ११ शेतकऱ्यांनी कोरले शेतीनिष्ठ पुरस्कारावर नाव

By admin | Published: February 28, 2015 12:15 AM2015-02-28T00:15:57+5:302015-02-28T00:15:57+5:30

बागायती तालुका म्हणून ओळखल्या जात असलेल्या सेलू तालुक्यात पहिला शेतीनिष्ठ पुरस्कार १९६७ मध्ये मिळाला. यात २०१४ पर्यंत एकूण ४८ वर्षांत ११ एकूण शेतकऱ्यांनी शेतीनिष्ठ पुरस्कारावर त्यांचे नाव कोरले.

11 farmers from the taluka named for the Kurale Agricultural Award | तालुक्यातील ११ शेतकऱ्यांनी कोरले शेतीनिष्ठ पुरस्कारावर नाव

तालुक्यातील ११ शेतकऱ्यांनी कोरले शेतीनिष्ठ पुरस्कारावर नाव

Next

विजय माहुरे घोराड
बागायती तालुका म्हणून ओळखल्या जात असलेल्या सेलू तालुक्यात पहिला शेतीनिष्ठ पुरस्कार १९६७ मध्ये मिळाला. यात २०१४ पर्यंत एकूण ४८ वर्षांत ११ एकूण शेतकऱ्यांनी शेतीनिष्ठ पुरस्कारावर त्यांचे नाव कोरले. असे असले तरी जिजामाता कृषिभूषण व कृषिरत्न पुरस्कारापासून तालुका आजही वंचितच राहिला आहे.
शेतातील काळ्या मातीत घाम गाळून धान्य विकविणाऱ्या शेतकऱ्यांची आजची स्थिती बिकट झाल्याचे वास्तव आहे. कधी काळी मिळालेले हे पुरस्कार शेतकऱ्यांना अरज मदत देणारे ठरू शकतात. तालुक्यात १९६७ मध्ये पहिला शेतीनिष्ठ पुरस्काराचे सालई (पेवठ) येथील रामचंद्र आत्माराम अहेर यांनी पटकाविला.
शेतीत उत्कृष्ट कार्य, नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब, शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन करणारे, सामाजिक बांधिलकीतून काम, नवनविन पिके घेवून प्रगती करणाऱ्या तसेच सतत तीन वर्ष कृषी पर्यटन यात शेतकऱ्यांचा सहभाग आवश्यक आहे. सोबतच मत्स्य व्यवसाय, दुग्धव्यवसाय, भाजीपाला, फळबाग व फुलबाग घेणारे शेतकरी तसेच गोबर गॅस, सौरशक्ती, निर्धूर चुली, पवन चक्की याही बाबी शेतकऱ्यांना पुरस्कारासाठी केलेल्या अर्जात नमूद कराव्या लागत आहे. यावर पंचायत समिती व जिल्हा परिषदच्या कृषी विभागामार्फत पाहणी करून गुण दिले जाते.
बागायती तालुका असलेल्या यास परिसरात केळी, ऊस, लांब धाग्याचा कापूस पिकविणारे व नवनवीन पिके घेणारे शेतकरी आहेत. शेडनेट, पॉलीहाऊसच्या माध्यमातून दर्जदार पिके घेण्याकरिता युवा शेतकरी धडपड करीत आहे.
या पुरस्कारासाठी प्रस्ताव शेतकरी सादर करीत असताना पंचायत समितीच्या कृषी विभागातील अधिकारी योग्य मार्गदर्शन आवश्यक ुआहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळत नसल्याने बहुतांश शेतकरी प्रस्तावच सादर करीत नसल्याचे दिसून येत आहे. तालुका कृषी विभागाच्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: 11 farmers from the taluka named for the Kurale Agricultural Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.