देवळीच्या गॅस एजन्सीला १.१० लाखांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 11:52 PM2018-12-19T23:52:23+5:302018-12-19T23:52:48+5:30
देवळी येथे जुगनाके नामक व्यक्तीच्या नावाने इंडियन आॅईल कार्पोरेशन लिमिटेडने व्यावसायिक व घरगुती वापराचे गॅस सिलिंडर वितरणाची एजन्सी दिली आहे. परंतु, याच एजन्सीद्वारे ग्राहकांना पाहिजे तशी सेवा दिली जात नसल्याची तक्रार प्राप्त होताच सदर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी अचानक छापा टाकून पाहणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : देवळी येथे जुगनाके नामक व्यक्तीच्या नावाने इंडियन आॅईल कार्पोरेशन लिमिटेडने व्यावसायिक व घरगुती वापराचे गॅस सिलिंडर वितरणाची एजन्सी दिली आहे. परंतु, याच एजन्सीद्वारे ग्राहकांना पाहिजे तशी सेवा दिली जात नसल्याची तक्रार प्राप्त होताच सदर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी अचानक छापा टाकून पाहणी केली. यावेळी त्यांना सुरक्षेसह विविध प्रकारच्या एकूण १२ त्रुटी आढळल्या. त्याच त्रुटी पुढे करीत देवळीच्या गॅस सिलिंडर वितरण एजन्सीला इंडियन आॅईल कार्पोरेशन लिमिटेडचे व्ही. डी. सातदिवे यांनी १ लाख १० हजार ३३० रुपयांचा दंड ठोठावला आहे.
गॅस सिलिंडर धारकांना घरपोच सिंलिडर पोहोचविले जात नाही. आॅन लाईन नोंदणी करूनही दहा-दहा दिवस ग्राहकांना गॅस सिलिंडर दिल्या जात नाही. गरीब व गरजुंच्या वाट्याचा उपलब्ध गॅस सिलिंडरचा साठा धनाड्य व्यावसायिकांना चढ्या दराने पुरविला जातो, अशा आशयाच्या तक्रारी युवा परिवर्तन की आवाज या सामाजिक संघटनेला प्राप्त झाल्या होत्या. नागरिकांची समस्या लक्षात घेता युवा परिवर्तन की आवाज या संघटनेने सदर समस्या निकाली निघाव्या म्हणून सुरूवातीला देवळीच्या गॅस सिलिंडर वितरण एजन्सीला व त्यानंतर तहसीलदारांना निवेदन दिले. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने अखेर संतप्त नागरिकांनी युवा परिवर्तन की आवाजच्या नेतृत्त्वात तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. त्याची दखल जिल्हा पुरवठा अधिकाºयांनी घेतली.
तसेच योग्य कार्यवाहीसाठी इंडियन आॅईल कार्पोरेशनच्या नागपूर येथील अधिकाºयांशी पत्रव्यवहार केला. त्या पत्रव्यवहाराला केंद्रस्थानी ठेवून इंडियन आॅईल कार्पोरेशनच्या अधिकाºयांनी अचानक देवळी गाठून गोपनिय माहिती घेत देवळीच्या एजन्सीच्या कार्यप्रणालीची व तेथील सुविधांची माहिती जाणून घेतली. याच पाहणीत सदर अधिकाºयांना एकूण १२ त्रुट्या आढळून आल्या होत्या. त्याच त्रुट्यांना पुढे करून देवळीच्या सदर गॅस एजन्सीला १ लाख १० हजार ३३० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सदर आदेशावर इंडियन आॅईल कार्पोरेशन लिमिटेड नागपूरचे व्ही. डी. सातदिवे यांची स्वाक्षरी आहे. या आदेशामुळे देवळीच्या इंडियन गॅस एजन्सीच्या संचालकांच्या अडचणीत भर पडली आहे.
त्याच त्रुट्यांच्या अधारे परवाना रद्द होऊ शकतो
इंडियन आॅईल कार्पोरेशन लिमिटेडच्या नागपूर येथील अधिकाºयांनी ज्या १२ त्रुट्याना पुढे करून देवळीच्या गॅस एजन्सी धारकावर दंडात्मक कारवाई केली, त्याच १२ त्रुट्यांच्या आधारे सदर एजन्सीचा परवाना रद्द करण्याची कारवाई करता आली असती. सदर त्रुट्यांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने आणि ज्या कराराच्या आधारे तसेच अर्टी व शर्तीला अधिनस्त राहून एजन्सीमालकाने काम करणे होते त्यालाच फाटा दिला आहे. ही निंदनिय व गंभीर बाब आहे, असे पत्रकार परिषदेत अॅड. अरुण येवले यांनी सांगितले.
राजकीय दबाव तंत्राचा वापर
इंडियन आॅईल कार्पोरेशन लिमिटेडने देवळी येथे जुगनाके नामक व्यक्तीला अधिकृत वितरक म्हणून नियुक्त केले आहे. परंतु, या एजन्सीचा संपूर्ण कारभार भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाने यांच्या वरद हस्ताने चालतो. याच एजन्सीद्वारे वितरणीत करण्यात आलेल्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेत मोठा गैरप्रकार झाला आहे. लाभार्थ्यांकडून अतिरिक्त ५०० रुपये घेतले जात आहेत. इंडियन आॅईल कंपनी प्रशासनाने केलेली दंडात्मक कारवाई केवळ नाममात्र आहे. सदर एजन्सीचा परवानाच रद्द करून गैरप्रकार करणाºयांवर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. तशी आमची मागणीही आहे. इतकेच नव्हे तर सदर विषय उचलणाºया युवा परिवर्तन की आवाजच्या देवळीच्या कार्यकर्त्यांना सध्या विविध प्रकारच्या धमक्या दिल्या जात आहेत. सदर एजन्सीचा परवाना रद्द करून नागरिकांना सुविधा देण्यात याव्या, अशी मागणी पत्रकार परिषदेत युवा परिवर्तन की आवाजचे संस्थापक अध्यक्ष निहाल पांडे यांनी केली. पत्रकार परिषदेला अॅड. अरुण येवले, स्वप्नील कांबडी, प्रितेश इंगळे, गौरव वानखेडे, पलाश उमाटे आदींची उपस्थिती होती.