१११ जणांची माघार; ८१८ मध्ये राजकीय दंगल

By admin | Published: February 8, 2017 12:38 AM2017-02-08T00:38:18+5:302017-02-08T00:38:18+5:30

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचे रिंगण तयार झाले आहे. मंगळवारी नामांकन अर्ज परत घेण्याचा अखेरचा दिवस होता.

111 people withdrawn; The political turmoil in 818 | १११ जणांची माघार; ८१८ मध्ये राजकीय दंगल

१११ जणांची माघार; ८१८ मध्ये राजकीय दंगल

Next

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक : रिंगण तयार; अपक्षांना मिळाले निवडणूक चिन्ह
वर्धा : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचे रिंगण तयार झाले आहे. मंगळवारी नामांकन अर्ज परत घेण्याचा अखेरचा दिवस होता. यात दुपारी ३ वाजेपर्यंत एकूण १११ उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली. यामुळे आता रिंगणात ८१८ उमेदवार असून त्यांच्यात लढत होणार हे स्पष्ट झाले झाले असले तरी थेट लढतींकडे मतदारांचे लक्ष आहे. निवडणुकीतून माघार घेण्यासह आज अपक्षांना निवडणूक चिन्ह मिळाले आहे. चिन्ह मिळताच त्यांचाही प्रचार सुरू झाला आहे.
जिल्हा परिषदेकरिता नामांकन दाखल करणाऱ्या एकूण ४७ तर पंचायत समितीकरिता अर्ज करणाऱ्या एकूण ६४ इचछुकांनी नामांकन परत घेतले. यामुळे येत्या १६ फेबु्रवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या ५० जागांकरिता २८९ तर पंचायत समितीच्या १०० जागांकरिता ५२९ उमेदवार रिंगणात आहेत. यातील पक्षाच्या उमेदवारांनी नामांकन दाखल करताच प्रचार सुरू केला, तर आज अपक्षांना चिन्ह मिळाल्याने त्यांच्या प्रचाराचा नारळ बुधवारी (दि. ८) फुटणार आहे. काही ठिकाणी पक्ष आणि अपक्षातच थेट लढत असल्याने होणाऱ्या प्रचाराच्या रणधुमाळीकडे ग्रामीण जनतेचे लक्ष लागले आहे. यात कोण बाजी मारतो हे निकालाअंतीच कळणार आहे.
निवडणूक जाहीर झाली त्या काळापासूनच रिंगणात उतरण्याकरिता अनेकांनी बाशिंग बांधले होते. यात अनेकांनी नामांकन दाखल करण्याच्या दिवशी आठही तालुक्यात एकूण ९९६ इच्छुकांनी नामांकन दाखल केले होते. या नामांकन अर्जाची छाननी झाली. त्यात त्रुट्यांमुळे तब्बल ३३ इच्छुकांचे नामांकन बाद ठरले झाले. या छाननीत काही पक्षांच्या उमेदवारांनाही फटका बसला. छाननी अंती एकूण ९६६ नामांकन शिल्लक राहिले होते. त्यातील काहींनी आज अनेकांनी आपले अर्ज परत घेतले. या निवडणुकीत काहींनी पक्षासोबत बंडखोरी करीत दंड थोपटले. पक्षश्रेष्ठींच्या मनधरणीने काहींनी माघार घेतली तर काहींचे नामांकन कायमच आहे. त्यांच्या बंडखोरीमुळे पक्षाच्या उमेदवारांच्या अडचणी वाढणार आहे.

विरूळ गटावर आक्षेप
आर्वी तालुक्यातील विरूळ जिल्हा परिषदेच्या काही इच्छुकांकडून नामांकन अर्ज परत घेण्याची प्रक्रीया सुरू असताना काही अडचणींवरून आक्षेप घेतला. यामुळे येथे वाद उद्भवण्याची स्थिती निर्माण झाली होती. परिणामी येथील प्रक्रियेला ब्रेक देण्यात आला आहे. सदर प्रकरण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे गेले आहे. यावर येत्या १० तारखेला सुनावणी होणार असून त्यानंतरच काय तो निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामुळे या गटात किती उमेदवार राहणार याचे चित्र स्पष्ट झाले नाही. मात्र या गटांतर्गत येत असलेल्य गणांची स्थिती स्पष्ट झाली आहे.

 

Web Title: 111 people withdrawn; The political turmoil in 818

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.