११२ गावांतील कर्जमाफी अंदाजावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 11:56 PM2017-10-09T23:56:39+5:302017-10-09T23:57:12+5:30
शासनाच्यावतीने कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज भरण्यात आले. त्यात त्रुटी शोधणे आणि आक्षेप नोंदविण्याकरिता चावडी वाचनाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला.
रूपेश खैरी।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शासनाच्यावतीने कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज भरण्यात आले. त्यात त्रुटी शोधणे आणि आक्षेप नोंदविण्याकरिता चावडी वाचनाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. दरम्यानच्या काळात ग्रामपंचायतीची आचारसंहिता लागली. जिल्ह्यातील ११२ गावांत निवडणूक असल्याने चावडी वाचन झाले नाही. यामुळे या गावांतील आक्षेप नोंदविल्या गेले नाही. शिवाय आचारसंहिता संपल्यानंतर हा कार्यक्रम राबविण्याच्या कुठल्याही सूचना नाही. परिणामी या ११२ गावांतील कर्जमाफी केवळ अंदाजावरच ठरणार आहे.
आॅनलाईन अर्ज भरल्यानंतर त्यातील त्रुट्या काढण्याकरिता आणि आक्षेप नोंदविण्याकरिता गावागावांत चावडी वाचनाचा कार्यक्रम राबविण्यात आला. हा कार्यक्रम राबवून दिवाळीच्या पहिले म्हणजेच १६ आॅक्टोबरपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. या तारखेपर्यंत यादी तयार झाली पाहिजे असे आदेश शासनाचे आहेत. यानुसार जिल्हा प्रशासनाच्यावतीने काम सुूर आहे. या उप्रकामाकरिता जिल्ह्यातील सर्वच गावांत चावडी वाचणाचा कार्यक्रम राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला. या चावडी वाचनातून अनेक गावांतील शेतकºयांच्या अर्जाची माहिती देत त्यावर आक्षेप सादर करावयाचे होते. या आक्षेपानुरूप जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्यावतीने अंतिम यादी तयार करण्यात येणार होती. चावडी वाचन सुरू होण्यापूर्वीच जिल्ह्यातील तब्बल ११२ गावांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. कार्यक्रम जाहीर होताच आचारसंहिताही लागू झाली. परिणामी निवडणूक असलेल्या गावांत चावडी वाचनाचा कार्यक्रम झाला नाही.
यामुळे या गावातील शेतकºयांचे आक्षेप नोंदविण्यात आले नाही. परिणामी त्यांची कर्जमाफी अंदाजावरच मंजूर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. निवडणूक असलेल्या गावांत सध्या राजकीय रंग चढला असून त्याचा विपरीत परिणाम या कर्जमाफीच्या अर्जावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. निवडणूक असलेल्या गावांत सेवा सहकारी संस्थेच्या प्रतिनिधीने दिलेल्या माहितीवरून कार्यवाही होणार असल्याने साशंकता निर्माण झाली आहे.
निवडणुकीनंतर उपक्रम राबविण्याच्या सूचनाही नाही
ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता असल्याने अनेक गावांत चावडी वाचनाचा कार्यक्रम झाला नाही. यामुळे या गावात नेमका लाभ कोणाला मिळेल याचा नेम नाही. या गावांत निर्माण होणारी समस्या मार्गी काढण्याकरिता निवडणुकीनंतर चावडी वाचनावा कार्यक्रम घेण्यात येईल असे अनेकांना वाटत होते; मात्र तशा कुठल्याही सूचना नसल्याने या गावांतील शेतकºयांना आता अंदाजावरच लाभ मिळणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
संस्थेच्या प्रतिनिधीकडून घेणार अंदाज
शेतकºयांनी कर्जमाफीकरिता आॅनलाईन अर्ज केल्यानंतर त्यावर गावकºयांचे आक्षेप नोंदवावयाचे होते. या आक्षेपातून कर्जमाफीचा निर्णय घेण्यात येणार होता. मात्र अनेक गावांत चावडी वाचन झाले नाही, यामुळे या गावात केवळ अंदाजावर काम होणार असल्याचे दिसते.
शेतकºयांच्या अर्जाची माहिती आवश्यक
आॅनलाईन अर्ज भरताना काही शेतकºयांनी एका तर काहींनी दोन ठिकाणाहून अर्ज सादर केले होते. यामुळे यादी तयार करताना एकाच नाव दोनवेळा येणार असल्याची शक्यता निर्माण झाली. चावडी वाचनाच्या कार्याक्रमातून ही समस्या मार्गी लावावयाची होती. निवडणूक असलेल्या गावांत चावडी वाचन झाले नसल्याने या गावातील याद्यांत घोळ होण्याची पूर्ण शक्यता निर्माण झाली आहे.
खºया लाभार्थ्यांकरिता चावडी वाचन
कर्जमाफी मंजूर करताना अनेक अटी लादण्यात आल्या. या अटींची पूर्तता करून खºया लाभार्थ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा याकरिता चावडी वाचनाचा उपक्रम होता. या गावांत मात्र तसे झाले नाही. यामुळे आता खरा लाभार्थी सेवा सहकारी संस्थेचा प्रतिनिधी ठरविणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यामुळे नेमका लाभ कोणाला असा प्रश्न निर्माण होणार आहे.