१.१९ लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 12:17 AM2018-05-21T00:17:34+5:302018-05-21T00:17:34+5:30

स्थानिक शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या पथकाने आर्वी नाका परिसरात नाकेबंदी करून कारसह मोठ्या प्रमाणात विदेशी दारूसाठा असा एकूण १.१९ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईदरम्यान पोलिसांनी एका दारूविक्रेत्याला अटक केली आहे.

1.19 lakh worth of money seized | १.१९ लाखांचा मुद्देमाल जप्त

१.१९ लाखांचा मुद्देमाल जप्त

googlenewsNext
ठळक मुद्देएकाला अटक : वर्धा शहर ठाण्याच्या गुन्हे शाखेची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : स्थानिक शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या पथकाने आर्वी नाका परिसरात नाकेबंदी करून कारसह मोठ्या प्रमाणात विदेशी दारूसाठा असा एकूण १.१९ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईदरम्यान पोलिसांनी एका दारूविक्रेत्याला अटक केली आहे. ज्ञानेश्वर आत्माराम जाधव रा. आर्वी नाका झोपडपट्टी, असे अटकेतील आरोपीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.
आर्वी नाका परिसरातील झोपडपट्टी भागातील ज्ञानेश्वर आत्माराम जाधव हा त्याच्या मालकीच्या एम.एच. २९ एफ. ०९८५ क्रमांकाच्या कारने परिसरातील दारूविक्रेत्यांना विदेशी दारू पोहोचवून देत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या आधारे पोलिसांनी आर्वी नाका चौकात नाकेबंदी करून काही वाहनांची पाहणी केली असता सदर कारमध्ये मोठ्या प्रमाणात दारूसाठा आढळून आला. तो पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांनी या कारवाईत दारूची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली कार व १९ हजार २०० रुपये किंमतीची विदेशी दारू असा एकूण १ लाख १९ हजार २०० रुपयेचा मुद्देमाल जप्त केला. सदर प्रकरणी शहर ठाण्यात दारूविक्रेता ज्ञानेश्वर जाधव याच्याविरुद्ध मुंबई दारूबंदी कायद्यान्वे गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. ही कारवाई प्रभारी पोलीस उपअधीक्षक दिनेश कोल्हे, प्रभारी ठाणेदार विजय मगर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक नंदकिशोर खेकाडे, ना. पो. शि. जगदीश चव्हाण, पोलीस शिपाई रितेश शर्मा, मंगेश चावरे आदींनी केली. अवैध दारू विक्री होत असल्यास त्याची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
छापा टाकून विदेशीदारू पकडली
शहर पोलिसांच्या डिबी पथकाने भामटीपुरा भागातील बादल साहू याच्या घरी छापा टाकून विदेशी दारूसह इतर मुद्देमाल असा एकूण २१ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी शहर ठाण्यात बादल साहू याच्याविरुद्ध दारूबंदीच्या कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक नंदकिशोर खेकाडे, ना. पो. शि. जगदीश चव्हाण, पोलीस शिपाई रितेश शर्मा, मंगेश चावरे आदींनी केली.

Web Title: 1.19 lakh worth of money seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.