मंगल कार्यालये, विविध व्यावसायिकांंना १२ कोटींचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 05:00 AM2020-04-13T05:00:00+5:302020-04-13T05:00:02+5:30
तुळशी विवाह म्हणजे नोव्हेंबर महिन्यापासून विवाह सोहळे होत असले तरी एप्रिल, मे महिन्यात खºया अर्थाने लग्नसराईचा हंगाम असतो. चाकरमानी मंडळी, पै पाहुणे यांच्या सुटीचा हा कालावधी असतो. त्यामुळे बहुतांश विवाह सोहळे हे एप्रिल, मे महिन्यातच मोठ्या संख्येने होत असतात. यावर्षी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशात मार्चच्या पहिल्या आठवड्यापासूनच विविध प्रकारचे सोहळे, लग्नसमारंभ, राजकीय कार्यक्रम अशा सर्वावरच बंदी आणण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोनाच्या प्रादुर्भावाने देशात लॉकडाऊन करण्याची वेळ आली आणि अगदी मजुरीवर काम करणाऱ्या मजुरापासून अब्जावधीची उलाढाल सणाºया उद्योगपतीपर्यंत सर्वच घटकांना मोठा फटका बसला. कोरोनामुळे एप्रिल, मे महिन्यात होणारे ऐन लग्नसराईतील विवाह सोहळे रद्द करण्याची वेळ यजमानांवर आल्याने विवाह मंगल कार्यालये, डेकोरेटर्स, फुलवाले, कापड व्यापारी, सराफा, कॅटरर्स, किराणा मालाचे व्यापारी, फेटेवाले, वाजंत्री यांच्यासह जिल्ह्यातील विविध घटकांना सुमारे १२ कोटींच्या अर्थकारणावर पाणी सोडावे लागणार आहे.
आता एप्रिल महिना जवळपास निम्मा संपत आला आहे. लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढले. अशा परिस्थितीत लग्नसराईचा हंगाम पुरता वाया गेला आहे.
तुळशी विवाह म्हणजे नोव्हेंबर महिन्यापासून विवाह सोहळे होत असले तरी एप्रिल, मे महिन्यात खºया अर्थाने लग्नसराईचा हंगाम असतो. चाकरमानी मंडळी, पै पाहुणे यांच्या सुटीचा हा कालावधी असतो. त्यामुळे बहुतांश विवाह सोहळे हे एप्रिल, मे महिन्यातच मोठ्या संख्येने होत असतात. यावर्षी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशात मार्चच्या पहिल्या आठवड्यापासूनच विविध प्रकारचे सोहळे, लग्नसमारंभ, राजकीय कार्यक्रम अशा सर्वावरच बंदी आणण्यात आली. हळूहळू देशासह राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढू लागल्याने शाळा, महाविद्यालयांना सुट्या देण्यात आल्या. शासकीय कार्यालयातील उपस्थिती निम्म्यावर आणण्यात आली. तर २२ मार्चला पंतप्रधांनी देशात जनता कर्फ्यू लागू केला आणि त्यानंतर अगदी दोन दिवसांनीच देशभरात २१ दिवसांचे लॉकडाऊन करण्यात आले. लॉकडाऊनच्या कालावधीत ३० एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली. या लॉकडाऊनचा मोठा फटका एप्रिल, मे महिन्यातील विवाह सोहळ्यांना बसला आहे. धूमधडाक्यात लग्नसोहळा साजरा करण्याची आपल्याकडे पद्धत आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माणसांना एकत्र येण्यावरच बंधने आहेत. अशा पार्श्वभूमीवर लग्नसोहळे, करायचे कसे? नोकरी, धंद्यानिमित्त स्थिरावलेली मंडळी विविध ठिकाणी अडकून पडली आहेत. अशा परिस्थितीत वर्धेत पूर्वनियोजित ठरलेले एप्रिल, मे महिन्यातील विवाह सोहळे रद्द करण्याची वेळ आली आहे. अर्थात लॉकडाऊन कधी उठणार यावरच ते अवलंबून असणार आहे. लॉकडाऊन उठले तरी माणसांच्या संख्येवर निर्बंध येणार आहेत. अशा परिस्थितीत अनेक यजमानांनी विवाह साहळे पुढे ढकलल्याचे शहरातील विवाह मंगल कार्यालयचालकांनी सांगितले.
जिल्ह्यात १०० ते १२५ मंगल कार्यालये
जिल्ह्यात लहान-मोठे सुमारे शंभर ते सव्वाशे मंगल कार्यालये आहेत. ग्रामीण भागात अद्याप गावात विवाह सोहळे आयोजित करण्याची प्रथा आहे. साधारणपणे सव्वाशेपैकी ४० ते ५० मंगल कार्यालये सर्वच मुहूर्तासाठी बुक असतात. विवाह सोहळ्याबरोबरच साखरपुडे, मौंज, वाढदिवस असेही कार्यक्रम मंगल कार्यालयांमध्ये होत असतात. साधारणपणे एक विवाह झाला तर त्या मंगल कार्यालयाचे भाडे कॅटरर्स, डेकोरेटर्स, फुलवाले, कापड, किराणा व्यापारी. सराफ, वांजत्री आदी विविध घटकांना सुमारे दीड ते दोन लाखांचे निव्वळ उत्पन्न मिळत असते.
व्यवसायावर ५० कुटुंब निर्भर
लॉकडाऊनमुळे यंदा मार्च आणि एप्रिल महिन्यात होणारे विवाह सोहळे रद्द करावे लागले. एप्रिल महिन्यात १४, १५, २५ आणि २६ एप्रिल म्हणजे अक्षयतृतीया असे मुहूर्त होते. अक्षयतृतीयेला विवाह सोहळ्यांची संख्या अधिक होती. आतापर्यंत ८ ते १० विवाह सोहळे लागले आहेत. तर मे महिन्यातील १२ दिवस विवाह सोहळ्यांचे मुहूर्त होते. त्यावरही आता सावट निर्माण झाले आहे. जरी एप्रिल आणि मे महिन्यातील लग्नसोहळ्याचे अर्थकारण शक्यता नसल्याने या विविध घटकांना सुमारे १२ कोटींच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागणार आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा मोठा फटका ऐन लग्नसराई हंगामाला बसला आहे. दरवर्षी लग्नसराईत हंगामावेळी एवढे विवाह सोहळे असतात की आम्हाला एरवी नाईलाजास्तव ते सोडावे लागतात. मात्र, यावर्षी लॉकडाऊनमुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. एका विवाहसोहळ्यामुळे ५० कुटुंबांना फायदा होत असतो. मात्र, यावर्षी साऱ्यांवरच पाणी सोडावे लागले आहे. लॉकडाऊनच्या काळात या कुटुंबांची जबाबदारीही आली आहे. अनेकांनी पुढील वर्षी नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये आपले विवाह सोहळे पुढे ढकलले आहेत. त्यामुळे यंदाचा हंगाम आमच्यासाठी कसोटीचा असल्याचे जिल्ह्यातील अनेक मंगल कार्यालयचालक, मालकांनी सांगितले.