१२ जणांचे नामांकन अवैध

By admin | Published: September 29, 2014 11:09 PM2014-09-29T23:09:28+5:302014-09-29T23:09:28+5:30

विधानसभेच्या निवडणुकीत जिल्ह्यात एकूण १०० जणांनी नामांकन दाखल केले होते. या नामांकन अर्जाची सोमवारी छाननी करण्यात आली. यात १२ उमेदवारांचे नामांकन अवैध ठरले. तर आर्वी विधानसभा

12 nominations invalid | १२ जणांचे नामांकन अवैध

१२ जणांचे नामांकन अवैध

Next

वर्धा : विधानसभेच्या निवडणुकीत जिल्ह्यात एकूण १०० जणांनी नामांकन दाखल केले होते. या नामांकन अर्जाची सोमवारी छाननी करण्यात आली. यात १२ उमेदवारांचे नामांकन अवैध ठरले. तर आर्वी विधानसभा मतदार संघात एका उमेदवाराने अर्ज मागे घेतला आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्राच्या छाननीनंतर वर्धा विधानसभा मतदारसंघात चार अर्ज अवैध ठरल्याने २९ उमेदवार निवडणुकीत कायम आहेत. देवळी विधानसभा मतदारसंघात दोन नामांकन अवैध ठरल्याने २६, आर्वीत एक नामांकन अवैध ठरले तर एकाने अर्ज परत घेतल्याने १८ तर हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात पाच नामांकन अवैध ठरल्याने १४ उमेदवार रिंगणात आहेत.
जिल्ह्यात आजच्या घडीला एकूण ८६ नामांकन कायम आहे. नामांकन परत घेण्याची अंतिम तारीख १ आॅक्टोबर आहे. यानंतरच उमेदवारांची खरी संख्या कळणार आहे. अजून काही बंडखोरांचे नामांकन कायम आहे. यानंतर खरे काय ते समोर येईल. (प्रतिनिधी)
देवळीतून मनसे बाद
देवळी विधानसभा क्षेत्रातून एकमेव असलेला मनसेचा उमेदवार छानणीत बाद झाला आहे. मनसेचे उमेदवार राहूल वाढोणकर यांचे नामांकन अवैध ठरले आहे. यामुळे देवळीत निवडणुकरीपूर्वीच मनसे बाद झाल्याची चर्चा आहे.
हिंगणघाटातील काँगे्रसची बंडाळी संपुष्टात
हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात काँग्रेसकडून उषा थु्टे यांना उमेदवारी मिळाली. या जागेकरिता माधव घुसे यांनी दावा केला होता. ही उमेदवारी थुटे यांना मिळाल्याने माधव घुसे यांनी त्यांनी पत्नी साधना घुसे यांना अपक्ष उभे करुन बंडखोरीचे संकेत दिले; मात्र साधना घुसे यांचा अर्ज अवैध ठरल्याने ही बंडाळी निवडणुकीपूर्वी संपुष्टात आली.

Web Title: 12 nominations invalid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.