पालिका लावणार १२ हजार रोपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 12:03 AM2018-06-28T00:03:20+5:302018-06-28T00:04:23+5:30

यंदाच्या वर्षी तिसऱ्यांदा शासन व प्रशासन स्तरावर वृक्षलावड उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून वर्धा न.प.ला वरिष्ठांकडून यंदाच्या जुलै महिन्यात १० हजार वृक्ष लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आहे. मात्र, दिलेल्या उद्दिष्टांपेक्षा तब्बल दोन हजार जास्त रोपटे लागवडीचा मानस वर्धा न. प. प्रशासनाचा आहे.

 12 thousand seedlings to be planted | पालिका लावणार १२ हजार रोपे

पालिका लावणार १२ हजार रोपे

Next
ठळक मुद्देवृक्ष लागवड उपक्रम : विविध ठिकाणी खोदले ५ हजार खड्डे

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : यंदाच्या वर्षी तिसऱ्यांदा शासन व प्रशासन स्तरावर वृक्षलावड उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून वर्धा न.प.ला वरिष्ठांकडून यंदाच्या जुलै महिन्यात १० हजार वृक्ष लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आहे. मात्र, दिलेल्या उद्दिष्टांपेक्षा तब्बल दोन हजार जास्त रोपटे लागवडीचा मानस वर्धा न. प. प्रशासनाचा आहे. यासाठी सध्या युद्धपातळीवर प्रयत्नही सुरू असून वृक्षारोपणासाठी आतापर्यंत पाच हजार खड्डे खोदण्यात आले आहेत.
वर्धा जिल्ह्याला १३ कोटी वृक्ष लागवड उपक्रमांतर्गत २६ लाख रोपटे लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. सामाजिक वनीकरण व वन विभागाच्या नेतृत्वात जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालय सध्या सदर उद्दिष्टपूर्तीसाठी प्रयत्नही करीत आहेत. वर्धा न. प. प्रशासनाला या उपक्रमांतर्गत १० हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. वृक्ष लागवड हा उपक्रम केवळ शासकीय न राहता तो लोकचळवळ व्हावा या हेतूने तसेच यात लोकसहभाग वाढविण्यासाठी वर्धा न. प. चे अधिकारी व कर्मचारी तसेच लोकप्रतिनिधी विशेष प्रयत्न करीत असल्याचे दिसून येते. गत वर्षी पाच हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट वर्धा न.प.ला देण्यात आले होते. त्यावेळी प्रत्यक्षात विविध प्रजातींची ५ हजार ३१६ रोपटे न.प.च्या माध्यमातून लावण्यात आले. त्यानंतर उन्हाळ्याच्या सुरूवातीला त्यापैकी किती रोपटे जिवंत आहेत याचे सर्वक्षण करण्यात आले असता ३ हजार ८८० रोपटे जिवंत असल्याचे न. प. प्रशासनाच्या निदर्शनास आले. तर यंदा स्वच्छ, सुंदर व हरित वर्धा या हेतूला केंद्रस्थानी ठेवून दिलेल्या उद्दिष्टापैकी सुमारे २ हजार रोपटे जास्त लावण्याचा मानस न. प. प्रशासनाचा आहे.
शिवाय प्रत्येक वर्धेकराला यात कसे सहभागी करता येईल यासाठी प्रयत्नही केले जात आहेत.
१ हजार वृक्ष दगावले
गत वर्षी न.प. प्रशासनाने त्यांना दिलेल्या उद्दीष्टापैकी ३१६ वृक्ष जास्त लावले असले तरी सुमारे एक हजार वृक्ष विविध कारणांनी दगावल्याचे सांगण्यात आले. गत वर्षीची कसर यंदा जादा वृक्ष लागवड करून तसेच या उपक्रमात लोकसहभाग वाढवून काढण्यात येणार असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
उद्यानांच्या कामांमुळे अडथळा
वर्धा शहरातील सुमारे ४० रिकामे भुखंड ग्रिन झोन बनविण्यात येणार असून त्याचे काम निविदा काढून कंत्राटदारांच्या माध्यमातून सुरू करण्यात आले आहे. अनेक उद्यानांचे काम सध्या सुरू असल्याने वृक्ष लागवडीसाठी नेमके खड्डे कुठे खोदावे असा प्रश्न पालिका प्रशासनातील कर्मचाºयांना पडत आहे. एकूण संबंधीतांना विचारणा करीतच सध्या खड्डे खोदण्याचे काम पूर्ण केले जात आहे.
स्मृती वृक्ष लावण्याचे आवाहन
एखाद्याच्या जन्माचे औचित्य साधून तर विवाहित मुलीची आढवण म्हणून शहरातील नागरिकांनी आपल्या घराच्या परिसरात वृक्षारोपण करावे. त्यासाठी पालिका नि:शुल्क वृक्ष उपलब्ध करून देईल, असे आवाहन न.प.च्यावतीने करण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर एखाद्याच्या स्मृतीतही वृक्षारोपणासाठी रोपटे उपलब्ध करून देणार आहे. या उपक्रमात नागरिकांचा सहभाग वाढावा म्हणून सुमारे ५०० नागरिकांना वृक्षाचे महत्त्व पटवून देणारा एसएमएस पाठविण्याचे काम सध्या सुरू असल्याचे सांगण्यात आले.
मोजावे लागतेय ३.१२ लाख
१ जुलै ते ३१ जुलै या कालावधीत वर्धा शहरात ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार आहे. न.प. प्रशासन १२ हजार रोपटे लावणार असून त्यासाठी त्यांना ३ लाख १२ हजार रुपये मोजावे लागणार आहेत. वृक्षलागवडीसाठी लागणारे विविध प्रजातींची रोपटी पालिका प्रशासन वन विभागाकडून घेणार आहे. त्याबाबतची कागदोपत्री कार्यवाही अंतिम टप्प्यात असून सदर रकमेचा धनादेश देत रोपट्यांची उचल वनविभागाच्या हिंगणघाट येथील रोपवाटिकेतून करण्यात येणार आहे.

Web Title:  12 thousand seedlings to be planted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.