प्रतिपूर्तीच्या १.२० कोटींचे वाटप

By admin | Published: June 13, 2017 01:10 AM2017-06-13T01:10:15+5:302017-06-13T01:10:15+5:30

‘राईट टू एज्यूकेशन’ कायद्यांतर्गत प्रत्येक प्राथमिक शाळेत २५ प्रवेश आरक्षित केले आहेत.

1.20 crore allotment of reimbursement | प्रतिपूर्तीच्या १.२० कोटींचे वाटप

प्रतिपूर्तीच्या १.२० कोटींचे वाटप

Next

आरटीई अंतर्गत प्रवेश : तीन वर्षांतील थकबाकी मिळणार एकाच वेळी
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : ‘राईट टू एज्यूकेशन’ कायद्यांतर्गत प्रत्येक प्राथमिक शाळेत २५ प्रवेश आरक्षित केले आहेत. यापोटी शासनाकडून सदर शाळांना प्रतिपूर्ती केली जाते. २०१२ ते २०१५ पर्यंतची यातील काही रक्कम थकित होती. त्या रकमेचा मार्ग आता मोकळा झाला आहे. शिक्षण विभागाला यातील १ कोटी २० लाख ८४ हजार रुपये प्राप्त झाले आहेत. यात तीनही वर्षांची शिल्लक १ कोटी २० लाख २५ हजार ९९० रुपयांचे वाटप लवकरच इपीएसद्वारे करण्यात येणार आहे.
शिक्षण विभागाने यापूर्वी २०१२-१३ व २०१३-१४ या दोन सत्रातील १४२ शाळांना २ हजार ५४ विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे ७५ लाख २ हजार २३९ रुपये वितरित करण्यात आले होते. यातील उर्वरित रक्कम आता वितरित होणार ओह. शिवाय २०१४-१५ आणि २०१५-१६ च्या प्रतिपूर्तीची रक्कम शिल्लक होती. आता शिक्षण विभागाला यापोटी निधी मिळाल्याने थकित प्रतिपूर्तीच्या वाटपाचा मार्ग मोकळा झाला आहे. २०१४-१५ या सत्रात ९२ शाळांमध्ये २ हजार ६६५ विद्यार्थी प्रवेशित होते. २०१५-१६ मध्ये १०० शाळांमध्ये ३ हजार ६४४ विद्यार्थी तर २०१६-१७ मध्ये १२० शाळांमध्ये आरटीई २५ टक्के अंतर्गत ४ हजार १८२ विद्यार्थी प्रवेशित आहेत. २०१५-१६ या सत्रासाठी शिक्षण विभागाने शासनाकडे २ कोटी १८ लाख २८ हजार ५९६ रुपयांची मागणी केली होती. २०१६-१७ या सत्रासाठी ही मागणी २ कोटी ८५ लाख ५० हजार ९८४ रुपये एवढी आहे. शिक्षण विभागाला २०१६-१७ या सत्रासाठी तुर्तास ७० लाख ६३ हजार रुपये प्राप्त झाले आहेत. तीन वर्षांची थकित रक्कम वितरित केल्यानंतर ५८ हजार १०० रुपये शिल्लक राहणार आहे. या शिल्लक व प्राप्त रकमेतून २०१५-१६ सत्रातील प्रत्येक शाळेला १०.७४ टक्के रकमेचे वाटप केले जाणार आहे.
प्रतिपूर्तीची रक्कम शासनाकडून मिळत नसल्याने जिल्ह्यातील अनेक शाळा आरटीई अंतर्गत राखीव प्रवेश देण्यास टाळाटाळ करीत होती. यामुळे उपशिक्षणाधिकारी हजारे यांनी पाठपुरावा करीत ही रक्कम प्राप्त करून घेतली आहे. आता थकित रकमेचे वाटप होणार असल्याने शाळांनाही दिलासा मिळणार आहे.

यंदा १३६८ विद्यार्थ्यांचे प्रवेश
आरटीई कायद्यांतर्गत २०१७-१८ या सत्रासाठी जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागांवर १३६८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. यासाठी आलेल्या अर्जांतून २३४७ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. शिक्षण विभागाकडे २५ टक्के प्रमाणे १५६८ जागा आहेत. प्रवेशाच्या सात फेऱ्या आटोपल्या असून आणखी १९९ जागा शिक्षण विभागाकडे शिल्लक आहेत. या जागांवरही प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.

Web Title: 1.20 crore allotment of reimbursement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.