मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून जिल्ह्याकरिता १२.४३ कोटी मंजूर
By admin | Published: December 29, 2016 12:46 AM2016-12-29T00:46:05+5:302016-12-29T00:46:05+5:30
जिल्ह्यातील एकूण नऊ ग्रामीण रस्त्याच्या कामाकरिता १२ कोटी ४३ लाख २६ हजार रुपये ग्रामविकास विभागाने मंजूर केले आहे.
रामदास तडस : २६.२६ कि़मी. लांबीच्या नऊ ग्रामीण रस्त्यांचा विकास
वर्धा : जिल्ह्यातील एकूण नऊ ग्रामीण रस्त्याच्या कामाकरिता १२ कोटी ४३ लाख २६ हजार रुपये ग्रामविकास विभागाने मंजूर केले आहे. याबाबत मुख्यमंत्री ग्रामसडक योजना सन २०१६-१७ या वित्तीय वर्षात बॅच तीन अंतर्गत जिल्ह्यातील रस्त्यांचा दर्जा उंचावणार असून तसा निर्णय नुकताच झाल्याची माहिती खा. रामदास तडस यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
सदर रस्त्यात आर्वी तालुक्यातील एसएचडब्ल्यू २९५ ते दिघी मार्ग ५.७८ कि़मी, आष्टी तालुक्यातील एनएच ६ ते भिष्णूर मार्ग १.४० कि़मी., कारंजा तालुक्यातील ओडीआर ८७ ते पांजरा मार्ग १.५० कि़मी., व एमडीआर ५ ते खैरी मार्ग ३ कि़मी., देवळी तालुक्यातील बाभुळगाव ते सैदापूर रस्ता ३ कि़मी., हिंगणघाट तालुक्यातील कोल्ही ते ढिवरी-पिपरी रस्ता १.५१ कि़मी., सेलू तालुक्यातील एनएच ३६१ कान्हापूर ते वाहितपूर रस्ता २.५३ कि़मी. व एसएच ३६१ ते ब्राम्हणी पर्यंत रस्ता १.१४ कि़मी. वर्धा तालुक्यातील एस एच.३२६ करंजी (भोगे) ते पूजई रस्ता ६.४० कि़मी. अशा २६.२६ कि़मीचे नऊ ग्रामीण रस्ते दुरूस्तीचा कार्यक्रम मंजूर झाला आहे. यामुळे जिल्ह्याला ग्रामीण भागाकरिता चांगल्या दर्जाचे ग्रामीण रस्ते उपलब्ध होणार आहे.
सदर प्रशासकीय मान्यता २०१६-१७ या वित्तीय वर्षात टप्पा क्र. ३ अंतर्गत मंजूर झाली आहे. या पुढे देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला दिलेला शब्द पूर्ण करून ग्रामीण विकासाचा नवा पायंडा महाराष्ट्रात पाडतील. ग्रामीण भागाकरिता जिल्हा नियोजन समिती व प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्ते विकास करण्यात येत आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमुळे ग्रामीण विकासाकरिता नवीन विकल्प जनतेला उपलब्ध झालेला आहे.(प्रतिनिधी)