१८ जागांकरिता १२६ इच्छुकांचे नामांकन अर्ज

By admin | Published: September 4, 2016 12:30 AM2016-09-04T00:30:15+5:302016-09-04T00:30:15+5:30

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालकांच्या निवडीसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे.

126 interested nomination forms for 18 seats | १८ जागांकरिता १२६ इच्छुकांचे नामांकन अर्ज

१८ जागांकरिता १२६ इच्छुकांचे नामांकन अर्ज

Next

हिंगणघाट बाजार समिती निवडणूक : विक्रीच्या तुलनेत ५७ अर्ज कमी
हिंगणघाट : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालकांच्या निवडीसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. या निवडणुकीकरिता एकूण १८३ नामांकन पत्राची विक्री झाली असली तरी शेवटच्या तारखेपर्यंत १२६ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. विक्रीच्या तुलनेत एकूण ५७ अर्ज कमी झाल्याने त्यांच्या खरेदीदारांची बाहेरच मनधरणी झाली असावी, अशी चर्चा आहे. या निवडणुकीत इच्छुकांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतरच निवडणुकीत खरी रंगत येणार असल्याची चर्चा जोरात आहे.
या बाजार समितीच्या १८ संचालकांपैकी सर्वाधिक संचालक सहकारी संस्था मतदार संघात आहे. या संघात ११ जागा असून यापैकी ७ सर्वसाधारण, २ महिला, १ इतर मागास प्रवर्ग, १ विमुक्त जाती व भटक्या जमातीसाठी आहे. ग्रामपंचात मतदार संघातील ४ जागांपैकी २ जागा सर्वसाधारण, एक अनुसूचित जाती व १ आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकासाठी राखीव आहे. तर व्यापारी अडते मतदार गटातून २ व हमाल मापारी गटातून १ अशा एकूण १८ संचालक मंडळासाठी ८ आॅक्टोबरला मतदान होणार असून ९ आॅक्टोबरला मतमोजणी होणार आहे.
या निवडणुकीत सहकारी संस्था मतदार गटात ८६७ मतदार, ग्रामपंचायत मतदार संघात ६०४, व्यापारी अडते गटात ३९६ मतदार तर हमाल मापारी गटात ३८६ मतदार आहे.
या निवडणुकीकरिता आतापर्यंत दाखल झालेल्या अर्जात शिवसेना समर्थित पॅनल, भाजपा समर्पित आमदार समीर कुणावार गटाचे पॅनल तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अ‍ॅड. सुधीर कोठारी, माजी आमदार राजू तिमांडे, माजी आमदार प्रा. सुरेश देशमुख, काँग्रेसचे आमदार रणजीत कांबळे व शेतकरी संघटनेच्या मधुसूदन हरणे यांच्या सत्तारूढ आघाडीच्यावतीने अनेक इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
सद्यस्थितीत सर्वच गट पॅनलने नेते व इच्छुकांना दुखवायचे नाही, अशा धोरणाचा अवलंब केल्याने अनेकांनी एका पेक्षा अधिक गटात उमेदवारी अर्ज दाखल केली आहे; परंतु नामांकन अर्जांची छाणनी होवून उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर उरलेल्या उमेदवारात लढत होवून निवडणुकीत खरी रंगत भरणार असल्याचे चित्र आहे. अख्या विदर्भात नावलौकीक असलेल्या या निवडणुकीकडे केवळ जिल्ह्याचे नाही तर विदर्भाचे लक्ष लागले आहे. यात कोण बाजी मारतो हे निवडणुकीच्या निकालानंतरच कळणार आहे.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: 126 interested nomination forms for 18 seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.