१३ सदस्यांनी केले नंदादेवी शिखर सर

By admin | Published: June 27, 2017 01:18 AM2017-06-27T01:18:19+5:302017-06-27T01:18:19+5:30

महाराष्ट्र व गोवा राज्यातील १३ पर्यतारोहकांनी भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात उंच शिखर माऊंट ‘नंदादेवी’ शिखराच्या पायथ्यापर्यंत १४ हजार ५०० फुट उंच चढाई यशस्वीपणे पूर्ण केली आहे.

13 members made by Nandadevi Shikhar Sir | १३ सदस्यांनी केले नंदादेवी शिखर सर

१३ सदस्यांनी केले नंदादेवी शिखर सर

Next

राष्ट्रीय छात्रसेनेचे विद्यार्थी : वर्धेच्या गुजरकर यांनी केले नेतृत्व
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : महाराष्ट्र व गोवा राज्यातील १३ पर्यतारोहकांनी भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात उंच शिखर माऊंट ‘नंदादेवी’ शिखराच्या पायथ्यापर्यंत १४ हजार ५०० फुट उंच चढाई यशस्वीपणे पूर्ण केली आहे. यात २१ महाराष्ट्र बटालियनचे एनसीसी अधिकारी तथा प्रहार समाज जागृती संस्थेचे अध्यक्ष कॅप्टन प्रा. मोहन गुजरकर यांचा समावेश होता.
चढाईकरिता अत्यंत कठीण पातळीचे मानले जात असलेल्या ‘नंदादेवी बेस कॅम्प पर्वतारोहन अभियानाचे’ आयोजन मुंबईच्या हिमगिरी ट्रेकर्स फाऊंडेशनतर्फे करण्यात आले होते. सदर अभियानाचा शुभारंभ ७ जून रोजी उत्तराखंड राज्यातील चिलमधार ६५०० फुट उंच या ठिकाणावरून चढाईची सुरूवात करण्यात आली. हिमगिरीचे प्रमुख संतोष तेलंगे यांच्या मार्गदर्शनात चढाई दरम्यान लिलम ६०७० फुट उंच, बोगुडीयार ८२०० फुट, मरतोली ११,२५० फुट, रेलकोट १०,२५० फुट व गनधर ११,२०० फुट येथे रात्रीचा विसावा घेत १२ जून रोजी सकाळी ८ वाजता १४ हजार ५०० फुट उंच ‘नंदादेवी शिखराच्या पायथ्यापर्यंत यशस्वी चढाई केली. परतीची चढाई गनधर ते चिलमधार अंतर ४ दिवसांत पूर्ण करून १७ जून रोजी अभियान यशस्वी झाले.
‘नंदादेवी’ शिखर भारत-तिबेट सिमेजवळ असून हा भाग चढाईकरिता कठीण, निरंतर वाहणारा, हिमवारा व असुविधाजनक असल्याने फार कमी पर्वतारोहक या शिखराचे अभियान आयोजित करतात; पण हिमगिरीच्या ट्रेकर्संनी उच्च मनोबल व अजिंक्य साहसाच्या जोरावर ही चढाई यशस्वी केली. गुजरकर यांनी मागील वर्षी माऊंट एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंत चढाई पूर्ण केलेली असून ते २५ वर्षांपासून हिमालय पर्वतारोहन मोहीम आयोजित करीत आहे. या कामगिरीबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

Web Title: 13 members made by Nandadevi Shikhar Sir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.