कॅशलेस व्यवहारांसाठी १३ पॉर्इंट

By admin | Published: July 3, 2017 01:39 AM2017-07-03T01:39:47+5:302017-07-03T01:39:47+5:30

रेल्वे मंत्रालयाच्या निर्देशानुसार मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाद्वारे तीन रेल्वे स्थानकावर कॅशलेस व्यवहारासाठी पूर्णत; डिजीटलायझेशन करण्यात आले आहे.

13 points for cashless transactions | कॅशलेस व्यवहारांसाठी १३ पॉर्इंट

कॅशलेस व्यवहारांसाठी १३ पॉर्इंट

Next

वर्धा रेल्वे स्थानकावर सुविधा : कार्ड व मोबाईलद्वारेही पेमेंट
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : रेल्वे मंत्रालयाच्या निर्देशानुसार मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाद्वारे तीन रेल्वे स्थानकावर कॅशलेस व्यवहारासाठी पूर्णत; डिजीटलायझेशन करण्यात आले आहे. यात वर्धा रेल्वे स्थानकाचा समावेश करण्यात आला आहे. वर्धा स्थानकावर १३ पॉर्इंट आॅफ सेल तथा पेटीएम मशीन लावण्यात आल्या आहेत. या माध्यमातून प्रवाशांना डेबीट, के्रडीट कार्ड तथा मोबाईलच्या माध्यमातून तिकीट काढता येणार आहे.
रेल्वे प्रशासनाकडून वर्धा रेल्वे स्थानकावर कॅशलेस व्यवहारांसाठी एकूण १३ पॉर्इंट देण्यात आले आहेत. यात विविध ठिकाणी आठ पॉर्इंट आॅफ सेल मशीन लावण्यात आल्या आहेत. तीन मशीन अनारक्षित तिकीट खिडकीजवळ, तीन आरक्षित तिकीट खिडकीजवळ, एक विश्रामगृहामध्ये आणि बुक स्टॉलवर एक मशीन लावण्यात आली आहे. शिवाय पाच ठिकाणी पे-टीएम पॉर्इंट देण्यात आले आहेत. यात फ्रुट स्टॉलवर तीन, सर्वोदय बुक स्टॉलवर एक आणि पार्किंग स्टँडमध्ये एक पॉर्इंट देण्यात आलेला आहे. या माध्यमातून प्रवाशांना कॅशलेस व्यवहार करणे सोईचे होणार आहे. रोख रक्कम खर्च केल्याविना प्रवाशांना तिकीट काढता येणार असून काही खायचे झाले तरी कार्ड वा मोबाईलच्या माध्यमातून पेमेंट करता येणार आहे.
केंद्र शासनाने आखलेल्या कॅशलेस व्यवहारांच्या धोरणानुसार ही सुविधा रेल्वेद्वारे पुरविण्यात आली आहे. आता तिकीट काढण्यासाठी खिशात रोख रक्कम असणेच गरजेचे नाही. डेबीट वा क्रेडीट कार्ड तथा मोबाईलमध्ये पे-टीएम असले तरी तिकीट काढता येणे शक्य आहे. प्रवाशांनी या सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन वर्धा रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Web Title: 13 points for cashless transactions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.