१३ गावे बारूदच्या ढिगाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 11:56 PM2018-11-24T23:56:52+5:302018-11-24T23:57:45+5:30

पुलगाव लष्करी तळ परिसरात वारंवार होणाऱ्या जीवघेण्या घटनांमुळे देवळी तालुक्यातील १३ गावे बारूदच्या ढिगाऱ्यावर वसली असून या गावातील लोक प्रचंड दहशतीत राहात आहे.

13 villages on the dump truck | १३ गावे बारूदच्या ढिगाऱ्यावर

१३ गावे बारूदच्या ढिगाऱ्यावर

Next
ठळक मुद्देपुलगाव सीएडी कॅम्प प्रतिबंधित क्षेत्र : सन २००० पासून गावांचे पुनर्वसन दुर्लक्षित

हरिदास ढोक।
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : पुलगाव लष्करी तळ परिसरात वारंवार होणाऱ्या जीवघेण्या घटनांमुळे देवळी तालुक्यातील १३ गावे बारूदच्या ढिगाऱ्यावर वसली असून या गावातील लोक प्रचंड दहशतीत राहात आहे. त्यामुळे रक्षामंत्रालयाच्यावतीने सन २००२ ला पुलगाव डिफेन्सवॉलच्या बाहेरील दोन हजार यार्ड (२ कि़मी.) परिसरातील ही सर्व गावे हटविण्याची प्रक्रिया पार पाडली होती. पण सोळा वर्षाच्या कालावधीनंतरही येथील नारिकांना पुनर्वसनाची प्रतीक्षा आहे.
या तेरा गावांच्या पुनर्वसनासंदर्भात प्रक्रिया सुरु करुन सलग दोन वर्षपर्यंत या गावातील विकासकामे थांबविण्यात आली होती. रक्षा मंत्रालयाचे अप्पर सचिव ललीत चव्हाण यांनी राज्य सरकारला व राज्य सरकारने तत्कालीन जिल्हाधिकारी मिलिंद म्हैसकार यांच्या मार्फत संबंधित ग्रामपंचायतींना प्रतिबंधित क्षेत्र म्हणून नोटीस बजावून या गावांच्या पुनर्वसनाच्या प्रक्रियेला गती दिली होती. परंतु राज्य सरकारच्यावतीने संबंधित गावांना सेक्शन ४ ची नोटीस न दिल्याने तसेच वाढत्या राजकीय हस्तक्षेपामुळे या गावांच्या पुनर्वसेनाचा मुद्दा थंडबस्त्यात पडला होता. तेव्हापासून आजपर्यंतच्या १६ वर्षात या गावांच्या पुनर्वसनाबाबतची रक्षामंत्रालयाची फाईल धुळखात पडली आहे.
सन २००२ नुसार या गाव परिसराची लोकसंख्या २२ हजार ६५३ असून ४ हजार २६२ घरे तसेच ५०० हेक्टर जमीन आहे. हा सर्व परिसर ताबडतोब हटविण्याबाबतचे पत्र सीएडी कॅम्पचे तत्कालीन मेजर के.एस. महार, कॅप्टन पंजरन, मुंबई डिईओ पी.एल. रविदास व स्थानिक तहसीलदार टी.एस. बावणे यांचे स्वाक्षरीनिशी संबंधित ग्रामपंचायतींना पाठविण्यात आले होते. जिल्हाधिकारी व सीएडी कॅम्प अधिकाऱ्यांच्या पत्रानुसार सलग दोन वर्षापर्यंत या गावातील विकासाची कामे थांबविण्यात आली होती. परंतु गावाच्या पुनर्वसनाची प्रक्रिया किचकट व टप्प्याटप्प्याने करावयाची असल्याने त्यावेळी राज्यशासनाने रक्षामंत्रालयाला सांगितले होते.
तेव्हापासून क्षामंत्रालयाच्यावतीने प्रतिबंधित क्षेत्र म्हणून या गावांच्या पुनर्वसनाबाबत कोणतेही पाऊल उचलले नाही. त्यामुळे मागील काही वर्षात या भागात भयंकर घटना घडल्या आहे. जीवंत बॉम्ब गावात येवून पडल्याने जीवाच्या आकांताने लोक सैरावैरा पळाल्याचे उदाहरणे आहे. वारंवार होणाऱ्या घटनेत अनेकांचा जीव गेला आहे. त्यामुळे प्रतिबंधित ठरलेली गावे उठविण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

देवळी परिसरात गावांचे पुनर्वसन करा
देवळी तालुक्यातील नाचणगाव, पिपरी, आगरगाव, नागझरी, मुरदगाव, येसगाव, नंदपूर, शेकापूर, शेकापूर (झोपडी), चिटकी, हरलापूर, बच्चराजपूर आदी गावात नेहमी घडणाऱ्या घटना चिंताजनक ठरल्या आहे. भविष्यातील हानी टाळण्यासाठी या गावांचे देवळी भागात पुनर्वसन करण्यात यावे. अशी मागणीमाजी जि.प. सदस्य मोहन शिदोडकर यांनी लावून धरली आहे..

Web Title: 13 villages on the dump truck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.