१४ टेबलवरून होणार २७ फेऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 09:06 PM2019-05-22T21:06:07+5:302019-05-22T21:07:05+5:30

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरूवारी, २३ मे रोजी स्थानिक भारतीय खाद्य निगमच्या गोदाम परिसरात सकाळी ८ वाजतापासून होणार आहे. त्यासाठीची संपूर्ण तयारी झाली असून १४ टेबलावरून २७ फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

14 tables will be held 27 rounds | १४ टेबलवरून होणार २७ फेऱ्या

१४ टेबलवरून होणार २७ फेऱ्या

Next
ठळक मुद्देमतमोजणी केंद्राला पोलीस छावणीचे स्वरूप

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरूवारी, २३ मे रोजी स्थानिक भारतीय खाद्य निगमच्या गोदाम परिसरात सकाळी ८ वाजतापासून होणार आहे. त्यासाठीची संपूर्ण तयारी झाली असून १४ टेबलावरून २७ फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. विशेष म्हणजे, मतमोजणी केंद्रावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आल्याने या परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.
गुरूवारी सकाळी ८ वाजतापासून पोस्टल बॅलेटच्या, तर ८.३० वाजतापासून ईव्हीएम मशीनमधील मतांची मोजणी होणार आहे. तसेच ज्या मतदान केंद्रातील ईव्हीएम सुरू होणार नाही, त्या मतदान केंद्रावरील व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्यांची तपासणी करण्यात येणार आहे. ज्या परिसरात मतमोजणी करण्यात येणार आहे, त्या ठिकाणी काही अपवाद वगळता कुणालाही मोबाईल नेता येणार नाही. शिवाय ज्यांच्याकडे पास आणि ओळखपत्र आहे, अशांनाच मतमोजणी परिसरात जाता येणार आहे. वर्धा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात एकूण १४ उमेदवार आहेत; पण कमीत कमी १८ तासांत नवीन खासदार कोण, हे स्पष्ट होणार आहे.

अशी पारदर्शी होईल मतमोजणी
आक्षेप नोंदविणाºयांना निवडणूक निर्णय अधिकाºयांना लेखी अर्ज द्यावा लागणार आहे.
एक फेरी होईपर्यंत दुसऱ्या फेरीच्या पेट्या येणार नाहीत.
एकदा एन्ट्री झाल्यावर मतमोजणी केंद्रात प्रवेश मिळविणाऱ्याला बाहेर पडता येणार नाही.
वर्धा लोकसभा क्षेत्रातील १० लाख ६५ हजार ७७८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. शिवाय, काहींनी पोस्टल बॅलेट पद्धतीने मतदान केले होते. याच मतांची गुरुवारी मोजणी होणार आहे.
वर्धा लोकसभा क्षेत्रातील एकूण ३० भाग्यवान मतदान केंद्रांची सोडत पद्धतीने निवड करून या मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्यांची पडताळणी करण्यात येणार आहे. जिल्हाधिकाºयांच्या हस्ते भाग्यवान मतदान केंद्राच्या नावाची चिठ्ठी काढण्यात येणार आहे.
मतमोजणी प्रक्रिया पूर्णत्वास जाण्यासाठी सुमारे ४५० मनुष्यबळ कार्यरत करण्यात आले आहे. शिवाय, मतमोजणीदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचाही तगडा बंदोबस्त असणार आहे. मतमोजणी प्रक्रिया पारदर्शी व्हावी या हेतूने २८ सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. तसेच ३० व्हिडीओग्राफरही मतमोजणीचे चित्रीकरण करणार आहेत.

Web Title: 14 tables will be held 27 rounds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.