११७ बचत गटांना १.५० कोटीचे कर्ज वितरित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 10:04 PM2018-03-17T22:04:20+5:302018-03-17T22:04:20+5:30
येथील ११७ महिला बचत गट असून त्यांना सन २०१७-१८ मध्ये १ कोटी ५० लाख रुपयांचे कर्ज वितरीत करण्यात आले आहे. महिला सक्षम करणे हा उद्देश यातून जोपासण्यात आला असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले.
ऑनलाईन लोकमत
वायगाव (नि.) : येथील ११७ महिला बचत गट असून त्यांना सन २०१७-१८ मध्ये १ कोटी ५० लाख रुपयांचे कर्ज वितरीत करण्यात आले आहे. महिला सक्षम करणे हा उद्देश यातून जोपासण्यात आला असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले.
येथील व्यंकटेश बालाजी भगवान देवस्थानात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय स्टेट बॅँकेचे अधिकारी संतोष चाडोळकर, फिल्ड आॅफीसर भुषण काकर, जि.प. सदस्य चंद्रकांत ठक्कर, सरपंच प्रविण काटकर आदींची उपस्थिती होती. यावेळी संतोष चाडोळकर यांनी वितरीत करण्यात आलेल्या कर्जाची माहिती दिली. याशिवाय व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला माधुरी झाडे, रजनी शिरभय्ये, संगीता कामळी, पोर्णिमा वरवटकर, सुरज घायवट, रंजना मसराम उपस्थित होते. प्रास्ताविक आनंद केथकुलवार यांनी केले. संचालन नेहा देवतळे यांनी केले. यावेळी संगीत खुर्ची, रांगोळी, गुलदस्ता, सजावट आदी कार्यक्रमासह वृक्षारोपण, रॅली काढण्यात आली होती.