१५० नागरिकांना घातला गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 12:34 AM2019-02-16T00:34:36+5:302019-02-16T00:35:33+5:30
मानसी फायनान्स या कंपनीकडून लाख रूपयांचे कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली १५० जणांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उजेडात आली आहे. सदर व्यक्तींकडून प्रत्येकी ६ हजार रुपये उकळून त्यांना एकूण नऊ लाखांनी गंडा घालण्यात आला असून त्याबाबतची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) : मानसी फायनान्स या कंपनीकडून लाख रूपयांचे कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली १५० जणांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उजेडात आली आहे. सदर व्यक्तींकडून प्रत्येकी ६ हजार रुपये उकळून त्यांना एकूण नऊ लाखांनी गंडा घालण्यात आला असून त्याबाबतची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली आहे. चौकशी अंती गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
प्राप्त माहितीनुसार, अंतोरा येथील रविंद्र प्रांजळे, गणेश कुरवाडे चिंचोली या दोघा एजंटनी मानसी फायनान्स कन्सल्टन्सी प्रा. लि. न्यू लक्ष्मीनगर कॉलनी नं. २ जय प्लाझा सर्कीट हाऊस रोड गोरेगाव वेस्ट मुंबई या नावाने कंपनी तयार केली. याचे पत्रक छापून ग्रामीण भागात वाटण्यात आली.
यामध्ये विमा खर्च, प्रोसेसींग फी, कागदपत्र रजिस्टर्ड यासाठी सहा हजार रूपये देऊन एक लाख कर्ज मिळते, असे सांगितल्यावर लोकांनी त्यावर विश्वास करून पैसे देणे सुरू केले. लहान आर्वी ३५, देलवाडी २०, अंतोरा १५, खंबीत १६, अंबिकापूर १०, चिंचोली ४, किन्हाळा ५, जोलवाडी ७, बेलोरा १३, माणिकनगर ६ आणि इतर गावात २० असे एकूण १५० लोकांजवळून यामध्ये महिला बचत गट सदस्य, गावातील नागरीक यांच्याकडून प्रत्येकी सहा हजार रुपये गोळा करण्यात आले. त्याच्या पावत्या या दोन्ही एजंटनी दिल्या नाही. सर्व लोकांना २ नोव्हेंबर २०१८ ला प्रत्येकी १ लाख कर्ज देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आजवरी १७ वेळा तारीख पे तारीख देत मोठ्या प्रमाणात बनवेगिरी करण्यात आली. शेवटी लोकांनी प्रांजळे व कुरवाडे या दोघांना ६ हजार परत देण्याची मागणी केली असता त्यांनी पळून गेलो का, कंपनीने फसविले असे म्हणत पैसे देणाऱ्यांच्या अडचणीतच भर टाकली आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच देलवाडीचे राजेंद्र कोहळे, लहानआर्वीचे विलास गुंबळे व आदींनी आष्टी पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली.
आष्टी (शहीद)चे ठाणेदार जितेंद्र चांदे यांनी प्रकरणाची चौकशी सुरू केली असून याप्रकरणी आर्थीक फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले. ग्रामीण भागात अशा अनेक फायनान्स कंपन्यांनी जाळा पसरविले असून त्यांच्याकडून होणाºया आर्थिक फसवणुकीपासून वाचण्यासाठी नागरिकांनीही कुणालाही असे पैसे देवू नयेत, असे पोलिसांनी केले आहे.
मानसी फायनान्स या कंपनीकडून १ लाख कर्ज देतो असे सांगितल्यावर आम्ही त्यावर विश्वास ठेवून प्रत्येकी ६ हजार रूपये दिले होते. मात्र, ४ महिने लोटूनही कर्ज दिले नाही. आमची फसवणूकच झाली आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
- राजेंद्र कोहळे, देलवाडी.
सदर प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात तक्रार प्राप्त झाली आहे. या प्रकरणाची चौकशी करून आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात येईल.
- जितेंद्र चांदे, ठाणेदार, आष्टी (शहीद).