१५० पाणवठे भागवताहेत वन्यप्राण्यांची तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 09:27 PM2019-04-27T21:27:19+5:302019-04-27T21:28:16+5:30

अल्प पर्जन्यमानामुळे यंदा जिल्ह्यात जलसंकट गडद झाले आहे. याच्या मानवासह वन्यप्राण्यांना झळा सोसाव्या लागत आहेत. ही बाब लक्षात घेता वनविभागाने जिल्ह्यातील आठ वनपरिक्षेत्रांत वन्यप्राण्यांच्या तृष्णा-तृप्तीकरिता तब्बल कृत्रिम १५० पाणवठ्यांची निर्मिती केली आहे.

150 thirsty wild animals in Panchavatas | १५० पाणवठे भागवताहेत वन्यप्राण्यांची तहान

१५० पाणवठे भागवताहेत वन्यप्राण्यांची तहान

Next
ठळक मुद्देजिल्ह्यातील आठ वनपरिक्षेत्रातील स्थिती । प्रत्येक क्षेत्रात १६ ट्रॅप कॅमेऱ्यांचा असतो ‘वॉच’

सुहास घनोकार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : अल्प पर्जन्यमानामुळे यंदा जिल्ह्यात जलसंकट गडद झाले आहे. याच्या मानवासह वन्यप्राण्यांना झळा सोसाव्या लागत आहेत. ही बाब लक्षात घेता वनविभागाने जिल्ह्यातील आठ वनपरिक्षेत्रांत वन्यप्राण्यांच्या तृष्णा-तृप्तीकरिता तब्बल कृत्रिम १५० पाणवठ्यांची निर्मिती केली आहे. याशिवाय प्राण्यांच्या हालचालींवर वॉच ठेवण्याकरिता प्रत्येकी १६ ट्रॅप कॅमेरे लावले आहेत.
दरवर्षी पाणी प्रश्न निर्माण होत असला तरी यावेळी यावेळी प्रथमच या समस्येने उग्र रूप धारण केले आहे. जंंगल परिसरातील नदी-नाल्यांना कधीचीच कोरड पडली आहे. वनविभागाकडून साधारणत: मार्चच्या सुमारास कृत्रिम आणि नैसर्गिक पाणवठ्यांची निर्मिती केली जाते. आठ वनपरिक्षेत्रात वन्यप्राण्यांकरिता हातपंप, टाके, बशी टाके, नैसर्गिक झरा, तलाव, सौर पंप आदी प्रकारचे पाणवठे असून वन्यप्राण्यांची तहान भागविण्यास उपयोगी ठरत आहेत. कारंजा वनपरिक्षेत्रात २६, आष्टी वनपरिक्षेत्रात २३, तळेगाव २९, आर्वी २६, हिंगणी १२, वर्धा ३, समुद्रपूर १२ तर खरांगणा वनपरिक्षेत्रात १९ पाणवठ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक वनपरिक्षेत्रात १६ ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत. या माध्यमातून वन्यप्राण्यांच्या सुरक्षेसोबतच हालचालींवर वनविभागाकडून विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.

लिटमस पेपरने जलचाचणी
उन्हाळ्यात पाण्याच्या शोधार्थ वन्यप्राणी भटकंती करतात. बहुतांशवेळी गावाकडे धाव घेतात. याच दरम्यान जंगल परिसरातील नदी-नाल्यांना कोरड पडत असल्याने वन्यप्राण्यांकरिता कृत्रिम पाणवठे तयार केले जातात. मात्र, शिकाऱ्यांकडून धोका उद्भवू नये म्हणून पाणवठ्यात टाकल्या जाणाºया पाण्याची दर दोन दिवसांनी वनरक्षकाकडून लिटमस पेपरच्या माध्यमातून तपासणी केली जाते. पाण्याचा रंग बदलला म्हणजे ते विषारी झाल्याचे समजून पाणवठ्यातील पाणी बदलविले जाते. कर्मचाºयांकडून सातत्याने गस्त घातली जाते. वनपरिक्षेत्रातील संबंधित अधिकारी, कर्मचाºयांकडून यावर विशेष लक्ष ठेवले जाते.

Web Title: 150 thirsty wild animals in Panchavatas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.