दोन महिन्यांत केल्या १७ सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 10:16 PM2017-10-03T22:16:28+5:302017-10-03T22:16:41+5:30
आॅस्टीओआर्थ्रायटीस आणि ºहूमॅटॉईड आर्थ्रायटीस म्हणजेच अस्थिसंधीशोध, सांध्यांचा दाह, संधीवात या वर्तमानात आढळणाºया आरोग्यविषयक समस्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : आॅस्टीओआर्थ्रायटीस आणि ºहूमॅटॉईड आर्थ्रायटीस म्हणजेच अस्थिसंधीशोध, सांध्यांचा दाह, संधीवात या वर्तमानात आढळणाºया आरोग्यविषयक समस्या आहेत. अत्याधिक काम, जड वस्तूंचे वहन, व्यायामाचा अभाव आदी कारणांमुळे सांध्यांबाबतच्या समस्या उद्भवतात. यात गुडघे, कंबर खांदे आदींच्या सांध्यांचे निकामी होणे होय. सांधे निकामी झालेल्या १७ रुग्णांवर दोन महिन्यांत कृत्रिम सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय अस्थिरोग विभाग सावंगी (मेघे) द्वारे करण्यात आल्या.
एप्रिल महिन्यात सावंगी रुग्णालयात झालेल्या अस्थिरोग तपासणी शिबिरात सांधेदाह व अन्य समस्यांचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले होते. त्यांचे सांधे प्रत्यारोपणासाठी नोंदणी केलेल्या रुग्णांवर या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. अस्थिशल्यचिकित्सक तथा सावंगी रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप श्रीवास्तव, अस्थिरोग विभाग प्रमुख डॉ. संजय देशपांडे, डॉ. वसंत गावंडे, डॉ. विवेक मोरे यांच्या मार्गदर्शनात अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. गजानन पिसूळकर यांनी या शिबिराचे आयोजन केले होते. सुमारे २५० अस्थिविकार व संधीवाताचे रुग्ण या शिबिरात सहभागी झाले होते. सुमारे ६० रुग्णांना कटीभाग व गुडघ्यांच्या सांध्यांचे प्रत्यारोपण करण्याची गरज असल्याचे तपासणीत दिसून आले. यातील १७ रुग्णांवर डॉ. पिसूळकर यांनी सांधे प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडल्या.
सावंगी रुग्णालयात सुरू असलेल्या दत्तात्रय आरोग्य विमा कार्ड तसेच मुख्यमंत्री आरोग्य निधीतून या शस्त्रक्रियांसाठी तरतूद करण्यात आल्याने रुग्णांना आधुनिक सुविधेचा विनामूल्य लाभ प्राप्त झाला. शस्त्रक्रिये पश्चातच्या नियमित भौतिकोपचारानंतर या सर्व रुग्णांचे दैनंदिन कार्य पूर्ववत व वेदनारहित सुरू झाले आहे. सांध्यांचे विकार अधिक गुंतागुंतीचे आणि गंभीर होण्यापूर्वीच आधुनिक उपकरणांच्या साह्याने तपासणी करणे महत्त्वाचे ठरते. आज आधुनिक वैद्यकीय सुविधा व सांधे प्रत्यारोपणाच्या अद्यावत शस्त्रक्रिया उपलब्ध असल्या तरी शस्त्रक्रियेची वेळच येऊ नये, यासाठी दैनंदिन जीवनात व कामाच्या पद्धतीत सकारात्मक बदल केला पाहिजे. तसेच शरीराला नियमित व्यायामाची सवयही लावून घेतली पाहिजे, असे आवाहन ज्येष्ठ अस्थिशल्यचिकित्सक डॉ. श्रीवास्तव यांनी केले. या उपक्रमाला सहकार्य केल्याबद्दल डॉ. गजानन पिसूळकर यांनी कुलपती दत्ता मेघे तसेच व्यवस्थापन मंडळाचे सदस्य सागर मेघे यांचे आभार व्यक्त केले.