तळेगावातील १७ जण आमरण उपोषणावर

By Admin | Published: September 16, 2015 02:47 AM2015-09-16T02:47:26+5:302015-09-16T02:47:26+5:30

तालुक्यातील तळेगाव (टा.) मध्ये विविध विकास कामांत झालेल्या कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा गावकऱ्यांनी मंगळवारपासून

17 people from Talegaon, on fasting fast | तळेगावातील १७ जण आमरण उपोषणावर

तळेगावातील १७ जण आमरण उपोषणावर

googlenewsNext

ग्रा.पं.तील गैरव्यवहार प्रकरण : चौकशी व कायदेशीर कारवाईची मागणी
वर्धा : तालुक्यातील तळेगाव (टा.) मध्ये विविध विकास कामांत झालेल्या कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा गावकऱ्यांनी मंगळवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयापुढे सुरू केलेल्या आमरण ुउपोषणामुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे.
सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीला घेऊन गावातील तब्बल १७ जण उपोषणाला बसले आहेत. याकडे जिल्हा परिषदेसह गावकऱ्यांचे लक्ष याकडे लागले आहे. जिल्हा परिषदेवर भाजप समर्थित आघाडीची सत्ता आहे. या ग्रामपंचातीवरही भाजप समर्थित आघाडीची सत्ता असल्यामुळे या प्रकरणात भाजपची चांगलीच अडचण झाली आहे. तळेगाव ग्रामपंचायतील गैरव्यवहाराच्या चौकशी व कारवाईसाठी गावकऱ्यांनी २१ आॅगस्ट रोजी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज सादर केला होता. याचवेळी उपोषणाचा इशाराही दिलेला होता. चौकशीची काहीही माहिती तक्रारकर्ते गावकऱ्यांना पुरविली नाही.
वास्तविक, या प्रकरणाची अपेक्षित चौकशी झालेली नाही. त्यामुळे उपोषण करीत असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. पांडुरंग देशमुख, प्रशांत वंजारी, अशोक सुरकार, देविदास सुरकार, सुभाष तपासे, दिनेश हुडे, गजानन गवळी, किशोर तिमांडे, मधुकर तपासे, सतीश येऊलकर, चंदू गुजरकार, खेमदास कांबळे, संजय भोयर, गोविंद कोपरकर, हरिदास डांगरी, खुशाल पारवे, देवीदास खोडे, खेरदास कांबळे हे ग्रामस्थ उपोषणाला बसले आहेत.(जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: 17 people from Talegaon, on fasting fast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.