सामाजिक कार्यात अग्रेसर १७ ज्येष्ठांचा गुणगौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 11:01 PM2018-05-30T23:01:49+5:302018-05-30T23:02:03+5:30

ज्येष्ठ नागरिक सेवा महासंघ वर्धा जिल्ह्याच्यावतीने ज्येष्ठ नागरीक कल्याण कार्यक्रमांतर्गत सामाजिक कार्यात कार्यरत ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार समारंभ सेवा महासंघाच्या कार्यालयात घेण्यात आला. अध्यक्षस्थानी सेवा महासंघाचे अध्यक्ष तथा कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामभाऊ सातव तर अतिथी म्हणून अभ्यूदय मेघे, जयवंत साळवे, प्रा. तुकाराम माने, श्याम परसोडकर, व्यंकटेश बुंदे आदी उपस्थित होते.

17 senior poets in the social work | सामाजिक कार्यात अग्रेसर १७ ज्येष्ठांचा गुणगौरव

सामाजिक कार्यात अग्रेसर १७ ज्येष्ठांचा गुणगौरव

Next
ठळक मुद्देज्येष्ठ नागरिक सेवा महासंघाचा उपक्रम : मान्यवरांनी केला सत्कारमूर्तींच्या कार्याचा गौरव

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : ज्येष्ठ नागरिक सेवा महासंघ वर्धा जिल्ह्याच्यावतीने ज्येष्ठ नागरीक कल्याण कार्यक्रमांतर्गत सामाजिक कार्यात कार्यरत ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार समारंभ सेवा महासंघाच्या कार्यालयात घेण्यात आला. अध्यक्षस्थानी सेवा महासंघाचे अध्यक्ष तथा कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामभाऊ सातव तर अतिथी म्हणून अभ्यूदय मेघे, जयवंत साळवे, प्रा. तुकाराम माने, श्याम परसोडकर, व्यंकटेश बुंदे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रल्हाद गिरीपुंजे यांनी केले. यावेळी सहकार क्षेत्रात, वैद्यकीय क्षेत्रात, न्यायदानाचे कार्यात योगदान दिलेल्या तथा वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन व पर्यावरण रक्षण आदीमध्ये कार्यरत एकूण १७ व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यात जलसंधारण कार्यात सहभागी असणारे गायमुखचे भारत डवरे, सौरभ कौरती, खडका गावचे रामू नागतोडे, प्रणिता भुसारी, विवेक भोयर, सहकार सांस्कृतिक सामाजिक क्षेत्रात कार्यरत जयवंत साळवे, किसनसिंग पडोडे, राष्टÑसंतांच्या विचार प्रचार कार्यात सक्रीय सहभागी निरंजनअप्पा एरकेवार, बाबुराव वागदरकर, प्रा. तुकाराम माने, निळकंठ राऊत, अमृत मडावी, रामभाऊ कुचेवार, सैन्यात-युद्धभूमीत चार युद्ध जिंकलेले मनोहर पुरी, विजयकुमार ढोले, अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत सहभागी असलेले सुरेश रहाटे तसेच विशेष कार्यगौरव सुधाकर मेहरे, गणपतराव मेटकर आदींचा समावेश होता. या सर्वांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सुरेश रहाटे, मनोहर पुरी, पडोडे आदींनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. हेमा शिंदे यांनी केले तर उपस्थितांचे आभार सुधाकर मेहरे यांनी मानले. कार्यक्रमाला प्रा. दक्षता ढोके, अमोल बालपांडे, राजेंद्र गवळी, अभिजीत भोयर, व्यंकटेश बुंदे, ज्ञानेश्वर वैद्य, सुरेश बोरकर यासह पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.

Web Title: 17 senior poets in the social work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.