१७४ स्कूल बसेसचे परवाने निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 11:47 PM2019-08-19T23:47:22+5:302019-08-19T23:48:10+5:30

शैक्षणिक सत्राच्या प्रारंभी विद्यार्थ्यांची वाहतूक करण्याच्या दृष्टीने स्कूल बसेस योग्य आहेत अथवा नाहीत याविषयी उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी अभियान राबविले. दरम्यान, ४८४ वाहनांची तपासणी करण्यात आली होती.

१७४ School bus licenses suspended | १७४ स्कूल बसेसचे परवाने निलंबित

१७४ स्कूल बसेसचे परवाने निलंबित

Next
ठळक मुद्देआरटीओची कारवाई : पुनर्तपासणीला चालकांनी दाखविली पाठ

सुहास घनोकार।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शैक्षणिक सत्राच्या प्रारंभी विद्यार्थ्यांची वाहतूक करण्याच्या दृष्टीने स्कूल बसेस योग्य आहेत अथवा नाहीत याविषयी उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी अभियान राबविले. दरम्यान, ४८४ वाहनांची तपासणी करण्यात आली होती. यावेळी तब्बल १७४ स्कूल बससेचालकांनी तपासणीकडे पाठ फिरविल्याने या १७४ बसेसचे परवाने उपप्रादेशिक परिवहन विभागाने एका आदेशाद्वारे निलंबित केले.
विद्यार्थ्यांची वाहतूक करणाºया स्कूल बसेस, व्हॅन बहुतांशवेळी सुरक्षित नसतात. चालक, मालकाकडून वाहनाचा विमा उतरविलेला नसतो. याशिवाय इतर दस्तऐवज नूतनीकरण केलेले नसतात. स्कूल बस नियमावली २०११ नुसार विद्यार्थ्यांची वाहतूक स्कूल बसमधूनच बंधनकारक करण्यात आली आहे. कोणत्याही खासगी वाहनातून विद्यार्थ्यांची ने-आण होऊ नये याची खबरदारी घेण्याची सर्वस्वी जबाबदारी शालेय परिवहन समितीचे अध्यक्ष, अर्थात मुख्याध्यापकांची आहे. तशा उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या मार्गदर्शक सूचनादेखील असून खासगी वाहनांतून विद्यार्थ्यांची वाहतूक न करण्याचे आवाहनही विभागाने केले आहे.
स्कूल बसेसच्या अपघाताच्या वाढत्या घटना लक्षात घेता उपप्रादेशिक परिवहन विभागाने सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय तिराणकर यांच्या मार्गदर्शनात १ मे ते ८ जून दरम्यान तब्बल ४८४ स्कूल बसेसची धडक तपासणी मोहीम राबविली. यातील ३१० वाहनांची तपासणी करण्यात आली होती.
मात्र, या पुनर्तपासणी मोहिमेकडे १७४ स्कूल बसचालकांनी पाठ दाखवत तपासणी टाळल्याने या सर्व बसेसचे परवाने उपप्रादेशिक परिवहन विभागाने निलंबित करण्याचा निर्णय घेतला. अखेर या बसेसचे परवाने निलंबित करण्यात आल्याने आता सर्वत्र खळबळ उडाली आहे.
चालकांना उशीरा सुचले शहाणपण
१७४ स्कूल बसेसवर परवाना निलंबनाची कारवाई होताच उशीरा का होईना काही चालक, मालकांनी खडबडून जागे होत परवान्याचे नूतनीकरण आणि इतर सोपस्कार पार पाडण्याकरिता परिवहन कार्यालय गाठण्याकरिता धावपळ चालविली असल्याचे यावेळी सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय तिराणकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

Web Title: १७४ School bus licenses suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा