विदर्भस्तरीय फॅशन शोमध्ये १८ चमूंनी केला रॅमवॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 12:00 AM2018-09-30T00:00:44+5:302018-09-30T00:01:56+5:30

गांधीग्राम कॉलेज, वर्धा येथे आंतरराष्ट्रीय फॅशन दिवस निमित्ताने आंतरमहाविद्यालयीन विदर्भस्तरीय ‘दि अनस्टिच्ड फॅशन’ स्पर्धा घेण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून संस्था अध्यक्षा डॉ. सुनिता रवी शेंडे होत्या.

The 18-chamber ramawak in Vidarbha Fashion Show | विदर्भस्तरीय फॅशन शोमध्ये १८ चमूंनी केला रॅमवॉक

विदर्भस्तरीय फॅशन शोमध्ये १८ चमूंनी केला रॅमवॉक

Next
ठळक मुद्देगांधीग्राम महाविद्यालयाचा उपक्रम : नागपूरचे सोमलवार प्रथम, अमरावतीचे विदर्भ कॉलेज द्वितीय

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : गांधीग्राम कॉलेज, वर्धा येथे आंतरराष्ट्रीय फॅशन दिवस निमित्ताने आंतरमहाविद्यालयीन विदर्भस्तरीय ‘दि अनस्टिच्ड फॅशन’ स्पर्धा घेण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून संस्था अध्यक्षा डॉ. सुनिता रवी शेंडे होत्या. तर प्रमुख पाहुणे लोकशिक्षण मंडळ देवळी अध्यक्ष रवी प्रमोद शेंडे, संस्था सचिव सुनंदा किटे, कोषाध्यक्षा सुशिला माकडे, श्रीकांत गाडगे, इरा इंटरनॅशनल स्कूल संचालक प्रवीण फटींग, सुहास किटे, प्रभारी प्राचार्य स्मिता घाटोले आदी मान्यवर उपस्थित होते. फॅशन शो स्पर्धेचे परीक्षक म्हणून एल ए डी कॉलेज नागपूरच्या डॉ. हर्षा झारिया, डॉ. मृणालिनी केदार व पोस्टर स्पर्धेचे परीक्षक श्रीकांत गाडगे यांनी केले. कार्यक्रमाच्या फॅशन शो होस्टची भूमिका प्रशासकीय अधिकारी बरखा शेंडे व प्रा. विनिता खोटेले यांनी पार पाडली. आंतरमहाविद्यालयीन विदर्भस्तरीय ‘दि अनस्टिच्ड फॅशन शो’ मध्ये विदर्भातील विविध महाविद्यालयाच्या एकूण १८ चमूने भाग घेतला होता.
या स्पर्धेमध्ये गांधीग्राम कॉलेजने लागणारे साहित्य दिले होते. आणि त्यात टेक्सटाईल फेब्रिक, मेडिकल टेक्सटाईल, जिओ टेक्सटाईल आणि सरफेस आॅनमेंटसाठी लागणारे साहित्य दिले होते. त्यापासून विद्यार्थिनीनी ९० मिनिटात अतिशय आकर्षक ड्रेस तयार करून रॅम्पवॉक द्वारे सादरीकरण केले. त्यामध्ये प्रथम क्रमांक सोमलवार निकालस महिला महाविद्यालय नागपूरने द्वितीय क्रमांक विदर्भ महाविद्यालय अमरावतीने व तृतीय क्रमांक आयआयडीटी इंन्स्टिट्युट नागपूर चमूने पटकाविला.
विजेत्या चमूला रोख बक्षीस, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देवून पुरस्कृत केले. तसेच पोस्ट स्पर्धेचा पुरस्कार गांधीग्राम कॉलेजचा विद्यार्थी संकुल लभाने याला देण्यात आला. स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व रोख बक्षीस देवून पुरस्कृत केले. फॅशन शोच्या यशस्वीतेकरिता प्रशांत चावरे, प्रभारी प्राचार्य सारिका भागवत, प्रा. रंजना गावंडे, प्रा. मीना टेंभुर्णे, प्रा. रूपाली नगराळे, प्रा. जयश्री सोनुले, प्रा. श्रृती केळकर, प्रा. अमोल बावणे, प्रा. आशिष वाईले, प्रा. नेहाली कोंडलकर, प्रा. नितीन माकोडे, प्रा. प्रगती अंजनकर आदींनी परिश्रम घेतले.
९० मिनिटांत ड्रेस तयार
गांधीग्राम कॉलेजमध्ये दरवर्षी आंतरराष्ट्रीय फॅशन दिवसाचे आयोजन केले जाते. यंदा विदर्भाच्या विविध भागातून सहभागी झालेल्या १८ चमूंनी ९० मिनिटात अतिशय आकर्षक ड्रेस तयार केलेत. व रॅम्पवॉक करून त्यांचे सादरीकरण केले. याला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळाला.

Web Title: The 18-chamber ramawak in Vidarbha Fashion Show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fashionफॅशन