१.८५ लाख क्विंटल सोयाबीनची आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2018 10:17 PM2018-11-04T22:17:11+5:302018-11-04T22:17:37+5:30

शेतकऱ्यांसाठी दिवाळी बोनस अशी ओळख असलेल्या सोयाबीन पिकाचे यंदाच्या वर्षी कमी पावसामुळे पाहिजे तसे उतारेच आले नाही. जिल्ह्यात सरासरी हेक्टरी ५ पोते सोयाबीन झाल्याचे बोलले जात आहे. असे असतानाही शासनाच्या खरेदी केंद्रासह खासगी व्यापाऱ्यांकडून समाधानकारक भावही सोयाबीनला दिल्या जात नसल्याची ओरड होत आहे.

1.85 lakh quintals of soybean inward | १.८५ लाख क्विंटल सोयाबीनची आवक

१.८५ लाख क्विंटल सोयाबीनची आवक

Next
ठळक मुद्देदोन कृऊबातील महिन्याभऱ्याची स्थिती : शेतमाल तारण योजना ठरतेय फायद्याची

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शेतकऱ्यांसाठी दिवाळी बोनस अशी ओळख असलेल्या सोयाबीन पिकाचे यंदाच्या वर्षी कमी पावसामुळे पाहिजे तसे उतारेच आले नाही. जिल्ह्यात सरासरी हेक्टरी ५ पोते सोयाबीन झाल्याचे बोलले जात आहे. असे असतानाही शासनाच्या खरेदी केंद्रासह खासगी व्यापाऱ्यांकडून समाधानकारक भावही सोयाबीनला दिल्या जात नसल्याची ओरड होत आहे. मागील एक महिन्यात हिंगणघाट व वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीत एकूण १.८५ लाख क्विंटल सोयाबीनची आवक झाल्याची नोंद घेण्यात आली आहे.
यंदाच्या वर्षी सुरूवातीला पावसाने हुलकावणी दिल्याने पेरणी कशी करावी असाच प्रश्न शेतकºयांसमोर होता. त्यानंतर थोडाफार पाऊस झाल्याने शेतकºयांनी पेरणीच्या कामांना गती दिली. त्यानंतर वेळोवेळी पाऊस झाल्याने कापूस, सोयाबीन, तूर आदी पिकांची बऱ्यापैकी वाढही झाली. परंतु, सोयाबीन फुलावर असता जिल्ह्यातून पाऊस बेपत्ता झाला. शिवाय परतीच्या पावसानेही दगा दिल्याने पाहिजे त्या प्रमाणात सोयाबीनच्या शेंगा भरल्या नाही. त्यामुळे यंदाच्या वर्षी सोयाबीन उत्पदकांना चांगलाच फटका सहन करावा लागला आहे. दिवाळी पूर्वी उत्पादन हाती येत असल्याने सोयाबीनच्या लागवडीला यंदा जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले. परंतु, अरेखच्या टप्प्यात पावसाने दगा दिल्याने उत्पादनातही घट आल्याचे शेतकरी सांगतात. उत्पादन खर्च व सोयाबीनला मिळत असलेला दर यात मोठ्या प्रमाणात तफावत असल्याने उत्पादन खर्चावर आधारीत भाव सोयाबीनला द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. जिल्ह्यातील हिंगणघाट व वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीत १ आॅक्टोबर पासून सोयाबीन खरेदीला सुरूवात झाली असून त्या महिन्याच्या अखेरपर्यंत वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीत सुमारे २१ हजार क्विंटल सोयाबीन तर हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीत १ लाख ६४ हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. काही शेतकऱ्यांनी शेतमाल शेतमाल तारण योजनेचा लाभ घेतला आहे.

शेतमाल तारणाचा लाभ १०७ शेतकऱ्यांना
आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी शेतमाल तारण योजना फायद्याची ठरणारी आहे. सात हजार क्विंटल सोयाबीन साठविण्याची क्षमता असलेल्या वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीत ५७ शेतकºयांनी २ हजार क्विंटल सोयाबीन तारण योजनेत ठेवले आहे.
तर हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीत ५० शेतकऱ्यांनी तारण योजनेचा लाभ घेवून सुमारे २ हजार क्विंटल सोयाबीन ठेवले आहे. या शेतकºयांना सदर शेतमालाच्या मुळ किंमतीपैकी ७० टक्के रक्कम तात्काळ देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: 1.85 lakh quintals of soybean inward

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.