भोगवटदार नोंदीच्या घोळात २० टक्के शेतकरी सावकाराच्या दारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 08:57 PM2018-03-24T20:57:48+5:302018-03-24T20:57:48+5:30

आज शेतीसह विविध प्रकारच्या कर्जासाठी सातबाऱ्यावर वर्ग एकची नोंद पाहिली जाते. शेतकरी बॅँकेत गेल्यावर १ लक्ष रुपयांवर कर्जासाठी शेती गहाण करण्यासाठी भोगवटदार वर्ग दोन दिसल्याक्षणीच कर्ज नाकारले जात आहे. त्यामुळे आजही २० टक्के शेतकरी खासगी सावकाराच्या पाशात अडकल्याचे प्रतिपादन खा. रामदास तडस यांनी केले.

20 percent of the farmer's lenders in the entrepreneurial list | भोगवटदार नोंदीच्या घोळात २० टक्के शेतकरी सावकाराच्या दारी

भोगवटदार नोंदीच्या घोळात २० टक्के शेतकरी सावकाराच्या दारी

Next
ठळक मुद्देरामदास तडस : आंबोडा व पिंपळगाव येथे शेतकऱ्यांना सातबारा वाटप

आॅनलाईन लोकमत
वर्धा : आज शेतीसह विविध प्रकारच्या कर्जासाठी सातबाऱ्यावर वर्ग एकची नोंद पाहिली जाते. शेतकरी बॅँकेत गेल्यावर १ लक्ष रुपयांवर कर्जासाठी शेती गहाण करण्यासाठी भोगवटदार वर्ग दोन दिसल्याक्षणीच कर्ज नाकारले जात आहे. त्यामुळे आजही २० टक्के शेतकरी खासगी सावकाराच्या पाशात अडकल्याचे प्रतिपादन खा. रामदास तडस यांनी केले.
आंबोडा येथे आंबोडा व पिंपळगाव येथील शेकऱ्यांच्या शेती भोगवट दोन मधून एकमध्ये करून सातबारा वाटपाचा कार्यक्रम आयोजित होता. यावेळी ते बोलत होेते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच भैय्यासाहेब देशमुख तर प्रमुख अतिथी म्हणून भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश बकाने, पं.स. सभापती विद्या भुजाडे, सदस्य दुर्गा मडावी, भाजपा तालुका अध्यक्ष दीपक फुलकरी, नायब तहसीलदार भागवत, मंडळ अधिकारी वझलकर, तलाठी ठमके, मिलिंद भेंडे, राहुल चोपडा, सचिन कुऱ्हाडकर, राजू गोरडे, दशरथ भुजाडे उपस्थित होते.
आंबोडा व पिंपळगाव येथील ४५० शेतकऱ्यांचे भोगवट दोनचे वर्ग एकमध्ये करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात १०० सातबाºयाचे वाटप करण्यात आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. खा. तडस म्हणाले की, आंबोडा व पिंपळगाव येथील शेतकºयांच्या शेती भोगवट दोन मधून एक मध्ये करण्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आर्वी येथील कार्यक्रमात या गावातील शेतकºयांसह भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी ही समस्या त्वरित मार्गी लावण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. मुख्यमंत्री यांनी आपले आश्वासन पाळले व शेतकऱ्यांची मागील ३५ वर्षांपासून प्रलंबित असलेली समस्या मार्गी लागली. केंद्र व राज्य सरकार हे शेतकरी हिताचे असून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याकरिता कटीबद्ध असल्याचेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे आयोजन अंकुश साठोणे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन विना साठोणे यांनी केले तर आभार केशव निखार यांनी मानले. कार्यक्रमाकरिता सुनील साठोणे, भाष्कर साठोणे, सुरेश गवते, केशव चौधरी, सुधाकर शेळके, जगन पिसे, संदीप साठोणे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाकरिता आंबोडा व पिंपळगाव येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: 20 percent of the farmer's lenders in the entrepreneurial list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.