अपहरणाची २१ प्रकरणे थंडबस्त्यात

By admin | Published: July 7, 2017 01:36 AM2017-07-07T01:36:32+5:302017-07-07T01:36:32+5:30

जिल्ह्यात १८ वर्षांखालील बेपत्ता मुलांच्या तक्रारी हरविलेल्या मुलांच्या यादीत घेण्याऐवजी या प्रकरणी

21 cases of kidnapping in cold storage | अपहरणाची २१ प्रकरणे थंडबस्त्यात

अपहरणाची २१ प्रकरणे थंडबस्त्यात

Next

आॅपरेशन मुस्कान : बेपत्ता बालकांचा शोध
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यात १८ वर्षांखालील बेपत्ता मुलांच्या तक्रारी हरविलेल्या मुलांच्या यादीत घेण्याऐवजी या प्रकरणी अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. १० नोव्हेंबर २०१४ पासून अशा प्रकारातील एकूण २१ गुन्हे दाखल झाले आहे. या गुन्ह्याचा तपास लावण्यात पोलिसांना अद्याप अपयश आले आहे. दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार जिल्ह्यातून एकूण सहा मुले व १५ मुली बेपत्ता आहेत.
या मुलींच्या शोधाकरिताच जिल्ह्यात मुस्कान आॅपरेशन राबविण्यात येत आहे. यापूर्वी दोन वर्षे राबविण्यात येत आलेल्या अभियानांत अनेक बेपत्ता मुलांचा शोध लागला असून यातील नऊ मुले बेपत्ता असल्याची माहिती पोलीस विभागाकडून देण्यात आली आहे.
याच मुस्कान आॅपरेशनचा तिसरा टप्पा जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात बुधवारी जिल्हा पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांच्या अध्यक्षतेत पोलीस अधीक्षक कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी आॅपरेशन मुस्कान राबविताना करावयाच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. या अभियानात अशासकीय संस्था, रेल्वे स्थानक, बस स्थानक, मुलांची आश्रयस्थाने, रस्त्यावर भिक मागणारी अथवा वस्तू विकणारी मुले, कचरा गोळा करणारी मुले या सर्व प्रकारच्या मुलांना हरविलेली मुले समजून त्यांची तपासणी करून त्यातील बेपत्ता मुलांचा तसेच मुलींचा शोध घेण्यात येणार आहे. कित्येकदा मुले पळवून नेवून त्यांना वाममार्गाला लावून त्यांच्याकडून अवैध कामे करवून घेण्यात येतात. अशा दृष्टीत पडणाऱ्या इसमांवर लक्ष केंद्रीत करून वेळ पडल्यास मुलांचे डीएनए तपासणी सुद्धा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
आयोजित बैठकीला अपर पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत, महिला व बाल विकास अधिकारी ज्योती कडू, उषकाल बालगृह वर्धाच्या उषा फाले, परमार, सामाजिक कार्यकर्ता जिल्हा बाल सरंक्षण कक्षाच्या वैशाली मिस्कीन, सरकारी कामगार अधिकारी कार्यालय येथील आशिष खंडार, चाईल्ड लाईनचे केंद्र समन्वयक आशिष मोडक, गजानन मडावी, स्थानिक गुन्हे शाखा वर्धाचे पोलीस हवालदार एम.बी. नगराळे उपस्थित होते.
जनतेने आॅपरेशन मुस्कान मोहिमेत सहभागी होत अशी मुले आढळून आल्यास किंवा एखाद्या इसमासोबत बरीच मुले राहत असल्यास किंवा सार्वजनिक ठिकाणी एखादे मुल बरेच वेळापासून एकटेच रडताना दिसल्यास पोलीस नियंत्रण कक्षात ०७१५२-२३२५०० या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे पोलीस विभागाकडून कळविण्यात आले आहे.

२ टप्प्यानंतरही ९ मुले बेपत्ता
च्जिल्ह्यात सन २०१० ते २०१७ पावेतो १८ वर्षाखालील ३९८ मुले व ६२९ मुली बेपत्ता असल्याच्या तक्रारी नोंदविण्यात आल्या होत्या. त्यांचा वेळोवेळी जिल्हास्तरावर तसेच पोलीस ठाण्याच्या स्तरावर हरविलेल्या इसमांची विशेष शोध मोहीम राबविण्यात आली आहे. तसेच शासनाने निर्गमित केलेल्या आदेशांप्रमाणे सन २०१५ पासून जिल्ह्यात आॅपरेशन मुस्कान राबविण्यात येत आहे. यात बेपत्ता असलेली ३९५ मुले आणि ६२३ मुलींचा शोध लागला आहे.

Web Title: 21 cases of kidnapping in cold storage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.