२१ युनिटचे १६६ तर १८ युनिटचे ३३२ रुपये देयक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 11:42 PM2018-12-18T23:42:43+5:302018-12-18T23:46:19+5:30
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग या-ना त्या कारणाने नागरिकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. आम्ही स्वच्छ; शुद्ध पाणी नागरिकांना देतो असे म्हणत कॉलर टाईट करणाऱ्या याच विभागाने आता जावाई शोध लावल्याचे एका प्रकरणावरून दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग या-ना त्या कारणाने नागरिकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. आम्ही स्वच्छ; शुद्ध पाणी नागरिकांना देतो असे म्हणत कॉलर टाईट करणाऱ्या याच विभागाने आता जावाई शोध लावल्याचे एका प्रकरणावरून दिसून येत आहे. आॅक्टोबर महिन्यातील पाणी वापराचे देयक देताना याच विभागाच्या अधिकाऱ्यांनी सिंदी (मेघे) येथील एका ग्राहकाला २१ युनिटचे ११६ रुपये तर दुसऱ्या ग्राहकाला १८ युनिटचे चक्क ३३२ रुपयांचे देयक दिले आहे. या प्रकरणी तक्रार देऊनही दुर्लक्ष केल्या जात असल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केले जात आहे.
सविस्त वृत्त असे की, सिंदी (मेघे) येथील रहिवासी असलेल्या अरुण कुंभारे यांना १ ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत १८ युनिट पाण्याचा वापर केल्याचे पुढे करीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्यावतीने ३३२ रुपयांचे देयक देण्यात आले. तर याच गावातील रहिवासी असलेल्या विजय नामदेव मसराम यांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने आॅक्टोबर महिन्याच्या २१ युनिट पाण्याच्या वापरासाठी १६६ रुपयांचे देयक दिले आहे. सदर दोन्ही देयकांवर जबाबदार अधिकारी म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपविभागीय अभियंता विलास उमळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्यावतीने पाण्याचे देयक देताना काहीतरी त्रुटी झाली असावी असे लक्षात येताच अरुण कुंभारे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यालय गाठून सदर समस्या अधिकाऱ्यांना सांगितली. परंतु, त्यांनाच दोषीच्या कठगड्यात उभे करून असभ्यतेची वागणून देण्यात आली.
शिवाय उडवा-उडवीची उत्तरे देऊन परत पाठविण्यात आल्याच्या आशयाची तक्रार कुंभारे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे. सदर प्रकरणाची चौकशी करून दोषी कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांवर कठोर कार्यवाही करून आपल्याला न्याय द्यावा, अशी मागणीही त्यांनी तक्रारीतून केली आहे.
देयकांमध्ये अनावधानाने त्रुट्या होतात. तसाच काहीसा प्रकार या प्रकरणी असावा. देयकांमधील त्रुट्या दुरूस्तीची जबाबदारी गायधने यांच्याकडे देण्यात आली आहे. देयकांमधील त्रुट्या त्यांच्या निदर्शनास ग्राहकांनी आणून द्याव्या. तात्काळ दुरूस्ती करण्यात येईल. कुण्या ग्राहकाला असभ्यतेची वागणूक देणे ही बाब निंदनियच आहे.
- विलास उमाळे, उपविभागीय अभियंता, म. जी. प्रा. वर्धा.